क्राइम

या कारणाने तरुणांनी प्राचार्य ला रुम च्या बाहेर काढून दिला चोप ; गमावली नोकरी

Spread the love

भंडारा / नवप्रहार डेस्क

 
                साकोली येथील फॉर्मसी कॉलेज मध्ये प्राचार्य पदावर कार्यरत एका व्यक्तीला तरुणांनी चांगलाच चोप दिला. उच्चशिक्षित या प्राचार्य ला मार तर खावाच लागला शिवाय नोकरीस देखील मुकावे लागले. . पी. एस .रघु असे त्याचे नाव असुन तो दक्षिण भारतीय आहे.
 
                       पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार साकोली येथील एका फॉर्मसी मध्ये प्राचार्य पदावर कार्यरत या भामट्यानेराष्ट्रीय महामार्गाला लागून स्टे ईन हाँटेलच्या समोर असलेल्या बागेत खेळण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीला जवळ बोलवून तिच्याशी अश्लील चाळे करीत, नको त्या ठिकाणी स्पर्श करणे सुरू केले. त्यामुळे मुलगी घाबरली व रडत घरी जाऊन तिने आईला झालेला प्रकार सांगितला. तोपर्यंत बागेत फिरायला आलेल्या तरुणांनाही हा प्रकार माहित झाला.
 
            संतापलेले तरुण तो भाड्याने राहत असलेल्या पंचशील वार्डातील त्याच्या रुम वर पोहचले. आणि त्याची चांगलीच धुलाई केली. आणि पोलिसांना बोलावून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी रघु याला ताब्यात घेऊन त्याच्यावर विविध कलमान्वये पोक्सो अंतर्गत कारवाई केलेली आहे.
कॉलेज व्यवस्थापनाने नोकरीतून केले बडतर्फ – 
प्राचार्याच्या गैरवर्तनाला पाहून कॉलेज व्यवस्थापनाने रात्रीच या प्राचार्याचा राजीनामा घेऊन त्याला नोकरीतून बडतर्फ केले आहे. उच्चशिक्षित आरोपी प्राचार्य पदावर काम करत होता. तो दक्षिण भारतीय असून तो लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी बोलताना इंग्रजीचा वापर करत असे.
या प्रकरणाचा तपास साकोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुमित्रा साखरकर या करीत आहेत.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
1
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close