बोगस अपंग ग्रामसेविका सुवर्णमाला रमेशराव गोवारे यांना निलंबीत करून सेवेतून बरखास्त करा
जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अपंग जनता दलाचा निवेदन
अमरावती:अमरावती जिल्हा परिषद मधील अपंग अनुशेष मधुन अपंग नसतांनी सुध्दा डॉक्टर सोबत संगनमत करून अपंगत्व कर्णबधिर प्रवर्गाचे प्रमाणपत्र बनवून घेऊन व ग्रामसेवक या पदावर नियुक्ती मिळवली म्हणून सुवर्णमाला रमेशराव गोवारे यांचे अपंगत्वाची फेरपडताळणी करण्यात यावी यासाठीअपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने सतत १ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पाठपुरावा करण्यात आला असून त्या तक्रारीच्या आधारे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, यांनी सदर ग्रामसेविका यांना त्यांच्या अपंगत्वाच्या फेरपडताळणीसाठी आदेशित केले होते. त्या अनुषंगाने सदर व्यक्तीने अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ऑनलाईन अपंग प्रमाणपत्राकरीता अर्ज दाखल करून तपासणी केली असता त्यांना २०% अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाले. परंतु त्यांनी मिळालेले २०% चे प्रमाणपत्र मान्य नसल्यामुळे आरोग्य उपसंचालक अकोला यांचे कडे अपिल सादर करून दाद मागितली असता आरोग्य उपसंचालक अकोला यांनी एक समिती गठीत करून अकोला मंडळ यांचे पत्र १९९६२-६४ दिनांक ०३/०४/२०२४ रोजी अपंग निर्देशित मंडळानी त्यांच्या अपंगत्वाची फेरपडताळणी केली व कानाचे कर्णबधिर या प्रवर्गाचे ८% अपंगत्व असल्याचे सिध्द करून तसा लेखी अहवाल दिला.त्या अहवालाच्य आधारे सदर ग्रामसेविका ह्या बोगस अपंग असल्याचे दिसून येत असून तरी आपण त्वरीत ह्या बोगस ग्रामसेविका सुवर्णमाला रमेशराव गोवारे यांना निलंबीत करून सेवेतून बरखास्त करावे. अशी मांगनी संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांच्याकडे निवेदनामधुन केलेली असुन नेवेदन देताना राजिक शहा,मयूर मेश्राम ,राहुल वानखडे, टीचकुले ताई, कांचन ताई कुकड़े सरोज पुनसे,निकिता कावरे,धनश्री पाटोकार, इत्यादि कार्यक्रते उपस्तित होते.