कौर्याची परिसीमा नवऱ्याला निर्वस्त्र करुन गुप्तांगावर दिले चटके आणि चाकू घेऊन …..

बेडरुममध्ये नवऱ्याला विवस्त्र झोपवलेलं, त्याचे हात-पाय बांधलेले, तो ओरडत होता, निर्दयी पत्नी पलंगावर आरामात बसून सिगारेटचे झुरके घेत होती, अधन-मधन ती पलंगावर झोपवलेल्या नवऱ्याला सिगारेटचे चटके देत होती. त्याच्या ओरडण्याने जणू तिला समाधान मिळत होतं. जितकावेळ ती डाग द्यायची, तितकावेळ तो दयेची भीख मागत होता. पण तिच्यावर नवऱ्याच्या ओरडण्याच्या, दयेच्या आर्जवाचा काहीही परिणाम झाला नाही. ती निदर्यतेने नवऱ्याच्या प्रायवेट पार्टला चटके देत राहिली. शिव्या देत होती. एवढ्याने तिचं मन भरलं नाही, तेव्हा तिने नवऱ्याच्या प्रायवेट पार्टवर चाकू ठेवला. सनकी पत्नीने केलेल्या अत्याचाराची ही गोष्ट उत्तर प्रदेश बिजनौरची आहे.
पत्नीकडून होणाऱ्या या अत्याचाराची गोष्ट जेव्हा नवऱ्याने पोलिसांना सांगितली, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. ते हैराण झाले. पुरावा म्हणून युवकाने सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना दिलं. त्यात पत्नीची कृत्य स्पष्टपणे दिसतायत. पतीची जबानी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा नोंदवलाय. आरोपी पत्नीला अटक केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.
दोघांच लव-मॅरेज होतं
युवकाने सांगितलं की, लग्ना आधीपासून मी पत्नीला ओळखत होतो. आमच्यात बोलणं सुरु झालं, त्यानंतर प्रेम झालं. कुटुंबाच्या समतीने 17 नोव्हेंबर 2023 रोजी मुस्लिम पद्धतीने लग्न झालं. युवकाच्या वडिलांच म्हणण आहे की, पत्नीच्या मनात येतं, तेव्हा ती मारहाण करते. बेडरुममध्ये क्रूर वागणूक देते. हे सर्वांसमोर यावं म्हणून युवकाने बेडरुममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते.
त्यानंतर पत्नीने त्याला विवस्त्र केलं
पतीने जे सांगितलय त्यानुसार, 29 एप्रिल 2024 रोजी पत्नीने त्याला दुधाचा ग्लास दिला. त्यात नशेच्या गोळ्या होत्या. दूध पिल्यानंतर तो बेशुद्ध झाला. त्यानंतर पत्नीने त्याला विवस्त्र केलं. त्याचे हात-पाय बांधले व त्याच्या प्रायवेट पार्टला सिगारेटचे चटके देत होती. इतकच नाही, हातात चाकू घेऊन त्याला जखमी केलं. या दरम्यान पत्नी सिगारेट ओढत होती.