रखरखत्या उन्हाळ्यात उमरखेड चे बसस्थानक तहानलेलेच.
प्रवाश्यांची गैरसोय तहान भागविण्यासाठी मोजावे लागतात पैसे
उमरखेड :(शहर प्रतिनिधी)
शहरातील एसटी बस स्थानकातून दिवसाला शेकडो प्रवासी ये जा प्रवास करित असतात मात्र रखरखत्या उन्हात जीवाची लाहीलाही होत असताना येथील बस्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय अथवा पाणपोही नसल्याने प्रवाशांच्या घश्याला कोरड पडत आहे. एसटीकडून प्रवाश्यांसाठी विविध योजना आणि सवलतींचा पाऊस येत आहे. मात्र ऐन कडक उन्हाचा पारा वाढतच आहे उन्हाळ्यात प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था नसल्याने प्रवासामधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान ऐन उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याचा पाणी नसल्याने प्रवाशांचे हाल होत असून प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे या बस्थानकात अनेक महिन्यापासून पाणी नसल्याच्या परिस्थितीला जबाबदार कोण असा सवाल प्रवाश्यांकडून विचारल्या जात आहे.
बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांना सोयी सुविधा पुरविण्याचे प्रत्यक्ष काम आगार व्यवस्थापकाचे आहे. मात्र या ठिकाणी येथील बसस्थानक आगाराच्या कक्षेत येत नाही का असा सवाल देखील विचारल्या जात आहे. आणखी किती दिवस समस्येला सामोरे जावे लागणार असा संतप्त सवाल प्रवाशी वर्गातून करण्यात येत आहे. येथील आगार प्रमुखांकडून निवडणूक कामासारख्या महत्त्वपूर्ण कामाला देखील गांभीर्याने घेण्यात आले नसल्याचा प्रकार समोर आला होता ईव्हीएम मतदान यंत्र पोहोचविण्यासाठी खराब टायरचे वाहन निवडणूक यंत्रणेला सोपविण्यात आले होते यामुळे सदरचे वाहन उमरखेड शहरां नजीक असलेल्या पेट्रोल पंपाजवळ पंचर होऊन बसले होते यामुळे या वाहनासोबत असलेला संपूर्ण ताफा अडकला होता याबाबतीत निवडणूक विभागाकडून संबंधित आगार प्रमुखांना नोटीस देखील बजावली होती परंतु याबाबतीत याप्रकरणी कुठलीही कार्यवाही झाली नसल्याची माहिती पुढे येत आहे एकूणच या सर्व प्रकारावरून उमरखेड आगाराच्या आगार प्रमुखाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे निवडणूक कामासारख्या बाबीला गांभीर्याने न घेणारे येथील आगार प्रमुख प्रवाशांच्या सुविधे कडे काय लक्ष देतील अशा संतप्त प्रतिक्रिया प्रवासी वर्गातून उमटताना दिसत असून राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी पुढे येत आहे
आगार प्रमुखाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे
पाण्यासाठी प्रवाश्यांच्या खिशाला कात्री
उन्हाळी सुट्या असल्याने हा एसटीच्या हंगामाचा काळ असतो. त्यामुळे बस्थानकात प्रवाशी संख्या वाढली आहे. राज्य शासनाकडून महिला आणि जेष्ठांसाठी प्रवास दरात सवलतीमुळे मोठ्या प्रमाणात प्रवासी संख्या वाढली असताना उमरखेड येथील बस्थानकात मात्र पिण्याच्या पाण्याअभावी प्रवाशांची दैना होत आहे. त्यामुळे प्रवाशांना बस्थानकात परिसरातून पाण्याच्या बाटल्या विकत घ्याव्या लागत असल्यामुळे नाहक प्रवाश्यांच्या खिशाला कात्री बसत आहे.