यवतमाळ जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीला राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ
प्रतिनिधी /संजय कारवटकर
यवतमाळ जिल्ह्याच्या बाभूळगाव तालुक्यात महापूर आल्याने स्थानिक पूरग्रस्तांसाठी राष्ट्रीय विश्वगामी यवतमाळ जिल्हा पत्रकार संघ धावून आला आहे. जिल्ह्यातील राणीअमरावती, चंडकापुर, वैजापूर, करळगाव, कोटंबा या गावामध्ये झालेल्या ढगफुटी व मुसळधार पावसामुळे नदीच्या काठावर वसलेल्या गावात महापूर आला आहे. महापुरात गावातील घरे, घरातील संपूर्ण अंनाज कपडा लता व इतर संसारोपयोगी साहित्य नदीच्या पुरामध्ये वाहून गेले आहे. पूरग्रस्तांसाठी राहण्याची व्यवस्था आजू बाजूच्या गावातील प्राथमिक शाळेमध्ये करण्यात आली आहे. सदर गावातील पूरग्रस्त लोकांचा ठाव ठीकाना लागे पर्यंत त्यांच्या जेवणाची जबाबदारी राष्ट्रीय विश्वगामी यवतमाळ जिल्हा पत्रकार संघाने घेतली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रत्नपाल डोफे यांनी दिली. राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेने मदतकार्य हाती घेतले असून जिल्हाध्यक्ष रत्नपाल डोफे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील पत्रकार बांधव याकामी सक्रिय सहभाग घेत आहे. बाभूळगाव महिला तालुकाध्यक्ष सौ वर्षाताई वाकडे, सुजाता डोफे.जिल्हा कार्यध्यक्ष संजय शेळके विश्वगामी कामगार संघ.ज्योत्स्ना बोथाडे तालुकाध्यक्ष विश्वगामी कामगार महिला संघ बाभूळगाव संघपाल डोफे सामाजिक कार्यकर्ते गोपाल बोबडे.प्रेमिला बोबडे, पालवी नागमोते.यांचे मोठे योगदान मिळत आहे . संबधित गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, बीट जामदार यांनी पत्रकार संघटनेच्या कामाचे कौतुक केले आहे.