मुख्याध्यापिका आणि शिक्षिकेने एकमेकांचे कपडे फाडले ; व्हिडीओ व्हायरल
आग्रा / नवप्रहार डेस्क
विद्यार्थ्यांचे भविष्य शिक्षकांच्या हातात असते. कारण शिक्षक हा विद्यार्थ्यांचा सगळ्यात मोठा गुरू आहे. पण याच गुरू कडून जर अशोभनीय कृत्य केल्या गेले तर विद्यार्थ्यांवर त्याचा काय परिणाम पडेल ? आग्रा येथील शाळेत असाच प्रकार घडला आहे. येथील एका शाळेत मुख्याध्यापिका आणि शिक्षिकेत हाणामारी झाकि असून त्यांनी एकमेकांचे कपडे फाटेपर्यंत परस्परांना मारहाण केली.
महिला शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यात शाळेत उशिरा येण्यावरून वाद झाल्याचं दिसत आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती न्युज २४ हिंदीच्या हवाल्यानुसार मिळत आहे.
हे संपूर्ण प्रकरण सिकंदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिग्ना पूर्व माध्यमिक शाळेशी संबंधित आहे. महिला शिक्षिका उशिरा आल्यामुळे मुख्याध्यापक संतापले. अन् त्यांनी शिक्षिकेला मारहाण केली (Teacher Fight Video) आहे. या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यात तुफान हाणामारी पाहायला मिळत आहे.
व्हिडिओमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षकांमध्ये भांडण सुरू असल्याचं दिसत आहे. या भांडणाच्या वेळी तिथे लहान मुलं देखील उपस्थित असल्याचं दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यामध्ये जोरदार भांडण होत असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडिओमुळे (viral video) आता शिक्षकांच्या वागणुकीवर प्रश्न उपस्थित होत आहे. शाळा विद्येचं माहेरघर आहे, तिथेच असभ्य वर्तन पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगात फिरत असल्याचं दिसतंय.
मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी भांडताना एकमेकांचे कपडे ओढले आहेत. त्यामुळे त्यांचे कपडे देखील फाटले आहेत. या हाणामारीत मुख्याध्यापिकेच्या चालकाचाही हात असल्याचा आरोप होत (viral news) आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय. सोशल मीडियावर लोकं आता या शिक्षकांच्या वागणुकीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. दोघींवर कारवाई करण्याची मागणी देखील करत आहेत.