युवक दिनानिमीत्य येरंडगाव शाळेत महापुरुषांची जयंती विद्यार्थाची प्रगती स्पर्धा संपन्न

घाटंजी तालुका प्रतिनीधी / सचिन कर्णेवार
राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती अर्थात युवक दिनानिमित्त 12/1/24 रोजी बीआरसी,शिक्षण विभागाचे मानव लढे व स्वप्निल वातीले यांच्या कल्पनेतून व परिश्रमातून “महापुरुषांची जयंती विद्यार्थ्यांची प्रगती” या उपक्रमाच्या माध्यमातून युवकास थोर समाज महापुरुष व खरे समाजसेक विवेकानंद,जिजामाता यांच्या जीवन कार्यावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन जि. प. उच्च प्राथमिक मराठी शाळा येरंडगाव येथे करण्यात आले होते.
या प्रश्न मंजूषाला सुरवात राष्ट्रमाता जिजाऊ व विवेकानंद प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आली. त्यानंतर केंद्राचे केंद्रप्रमुख संजय तुरक सर,बीआरसीचे मानव लढे यांनी उपस्थिता समोर विचार मांडले आणि विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांमध्ये महापुरुषांच्या वैचारिक विचारातून शैक्षणिक विचार व गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली होती.या स्पर्धेत मनश्री गोहणे, भक्ती ठाकरे, गणेश मोगरे अनुक्रमे इयत्ता 5 ,6,7 निहाय प्रथम क्रमांक तर कशिस सातपुडके, मीत ठाकरे,अलोक गोहणे अनुक्रमे इयत्ता 5,6,7 निहाय द्वितीय क्रमांक प्राप्त केला या विद्यार्थ्यांना बीआरसी आणि केंद्रप्रमुख यांच्या वतीने बक्षीस रजिस्टर,पेन व पुष्पगुच्छ देऊन कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमाचे संचालन शाळेतील शिक्षक गजेंद्र ढवळे सर व आभार प्रदर्शन राजेश उदार सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्राचे केंद्रप्रमुख संजय तुरक सर,सौ पल्लवी गावंडे ,कु.सारिका काकडे शिक्षीका व सर्व शिक्षक,विद्यार्थ्यांनी सहकार्य करीत खेळी मेळीच्या वातावरणात पार पडले.
00000000000