ग्रामदूत राष्ट्रसंत तुकोजी महाराज जयंती उत्साहात साजरी
घाटंजी ता प्रतिनिधि- सचिन कर्णेवार
घाटंजी-श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ घाटी घाटंजी व राष्ट्र निर्माण विचारधारा व समस्त ग्रामवासी, यांच्या संयुक्त पणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. जयंती निमित्ताने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अस्तिकलश स्मृती स्थळ घाटी घाटंजी येथील परिसर स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर सकाळी सामुदायिक ध्यानाचा कार्यक्रम व. संध्याकाळी सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली. याप्रसंगी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे माजी सचिव माणिकदास टोंगे महाराज प्रार्थनेचे महत्त्व सांगताना मनुष्याच्या जीवनात बदल घडते व चांगल्या वर्तनाने जीवनाने कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. असे प्रतिपादन केले. त्यानंतर मधुकरजी निस्ताने प्रार्थनेविषयी विचार व्यक्त करतांना म्हणाले की, वंदनीय राष्ट्रसंतांची ग्रामगीता हा अमूल्य ग्रंथ आहे.ग्रामगीता व महाराजांचे वाड्मय जर आपल्या जीवनात आचरणात आणले तर मनुष्य जीवनाचे सार्थक व कल्याण होऊंन गांव सुधारेल ग्रामगितेत गावाची महती सांगतांना राष्ट्रसंत सांगतात गावा हून कळतो देशाचा नकाशा गांव ची भंगता येईल देशासी अवदशा.ग्राम जागवा यावर मोरेश्वर वातीले यांनी आपले विचार व्यक्त करतांना म्हणाले की,ग्राम सुधारणेचा मूलमंत्र सज्जनांनी व्हावे एकत्र, संघटना हेची शक्तीचे सूत्र, ग्रामराज्य निर्माण करी. संघटनेमुळे मोठमोठे कार्य सुद्धा सहजरीत्या होऊ शकतात!. संघटनेचे महत्त्व सांगताना वातीले यांनी उदाहरण देत हतीसी आवरी गवती दोर, मुंग्या ही सर्पाशी करिती जर्जर हे पटवून दीले.संघटनेत खूप मोठी ताकत आहे म्हणून सर्वांनी संघटना करून राहावं असे विचार त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी प्रशांत बोंद्रे, नारायण रावजी राऊत , ज्ञानेश्वर राऊत, मधुकरराव गेडाम, पांडुरंग सहारे, शिवाजीराव सोयाम, सागर भाऊ विठाळकर, सुरेश जी बोपटे, गजेंद्र ढवळे, गणेशराव साबापुरे, विलासरावजी कोरांगे, दिलीप हेमके,संतोष मानकर, व त्यांचा संच, गुरुदेव सेवा भजन मंडळ बेलोरा . व राष्ट्र निर्माण विचारधारेचे संपूर्ण सदस्य, गुरुदेव भक्त , बहूसंख्येने महिला मंडळी याप्रसंगी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचाल हनुमान कुमरे यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन पांडुरंग किरणापुरे, संतोष वानखडे यांनी केले. याप्रसंगी मधुकररावजी खडसे यांच्याकडे स्नेहभोज व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
०००००००००००००००००