राळेगाव ते यवतमाळ रोडवर भिषण अपघात चार जण ठार, दहा जण जखमी
लग्नाच्या स्वागत समारंभ कार्यक्रम करुन परत जाताना घडली घटना
यवतमाळ / प्रतिनिधी
लग्नाचा स्वागत समारंभ आटपून परत यवतमाळ येथे जाणाऱ्या पाहुण्याच्या बसला वाटखेड गावाजवळ आयशर वाहनाने जबर धडक दिली़ या अपघातात चार जण जागीच ठार झाले असुन तर दहा जण जखमी झाले़ ही घटना 28 एप्रिलला मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घडली.
श्रावणी भोयर (10),परी भोयर (12) रा.घोंसी ता.पांढरकवडा, लिलाबाई पातूरकर रा. आदीलाबाद, निलेश काफेकर रा यवतमाळ असे अपघातातील मृतकांची नावे आहे़
तालुक्यातील खैरी येथे अनिकेत ताजने यांच्या विवाह सोहळ्याप्रसंगी स्वागत समारंभाला वधूकढील पाहुणे मंडळी खैरी येथे आले होते. स्वागत समारंभ आटोपून वधूकडील पाहुणे मंडळी खैरी येथून रात्री स्कुल बस क्र एम एच 37 बी 6823 ने यवतमाळ कडे निघाले. दरम्यान राळेगाव ते कळंब रोडवरील वाटखेड येथील शेताजवळ बसचा टायर पंक्चर झाला़ चालकाने बस रोडच्या बाजूला उभी करून पंचर काढत असतानाच कळंबकडून येणाऱ्या आयशर वाहन क्र एमएच 26 एच 8444 च्या चालकाने स्कुल बसला धडक दिली़ यात बस जोरात सरकल्याने खाली बसून असलेल्या चौघांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला़ या घटनेतील जखमींना राळेगाव येथील रूग्णालयात दाखल केले नंतर प्रकृती चिंताजनक असल्याने जखमीला यवतमाळ येथिल शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले़