मृत्यू ओढत घेऊन गेला त्यांना स्मशानाच्या दारा पर्यंत
नवी दिल्ली / नवप्रहार डेस्क
मृत्यू कधी आणि कसा ओढवेल याचा काही नेम नसतो. याचा प्रत्यय आणून देणारी घटना गुरुग्राम येथे घडली आहे. स्मशानभूमी जवळ खुर्च्या टाकून बसले आहेत. ते निवांत गप्पा मारत असतांना त्यांना या गोष्टीची पुसटशीही कल्पना नव्हती की मृत्यू त्यांना घ्यायला येत आहे. हे लोक जिथे बसले आहेत त्यांच्या बाजूला स्मशानभूमी ची भिंत होती. आणि पाहता पाहताच ही भिंत कोसळली. त्यामुळे भिंतीच्या बाजूला बसलेल्या 4 लोकांच्या अंगावर भिंत कोसळल्याने चार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या शेजारी उभा राहून त्यांच्याशी गप्पा मारणारा एक व्यक्ती थोडक्यात बचावला आहे.
गुरूग्रामच्या अर्जुन नगरमधील ही स्मशानभूमी आहे . जिथं काही लोक खुर्च्या टाकून निवांत गप्पा मारत बसले होते. त्यांच्यासोबत पुढे काय होणार आहे, याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल. अचानक त्यांच्यावर मृत्यूच कोसळला. त्यांच्या मृत्यू कॅमेऱ्यात कैद झाला आहे, हा व्हिडीओ पाहूनच तुम्हालाही धडकी भरले.
नेमकं त्यांच्यासोबत काय घडलं?
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका भिंतीजवळ काही लोक आहेत. चार जण खुर्चीवर बसले आहेत आणि एक व्यक्ती उभा आहे. ते ज्या भिंतीजवळ बसले आहेत, ती भिंत स्मशानभूमीची भिंत आहे. कुणालाही काही समजण्याच्या आत पूर्ण भिंतच्या भिंत कोसळते आणि ती त्यांच्या अंगावर बसते. खुर्चीवर बसलेले सर्व लोक या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली जातात. सुदैवानं तिथं उभी असलेली व्यक्ती वेळीच मागे होते, त्यामुळे तिचा जीव वाचतो.
नाशिकमध्ये भिंत कोसळून 2 मजुरांचा मृत्यू
काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्येही भिंत कोसळली होती. सावरकर नगरमध्ये गंगापूर रोडवर एका खासगी बंगल्याचं काम सुरू आहे. या बंगल्याच्या आवारात असलेल्या भिंतीचं बांधकाम कोसळलं. बांधकाम मजूर काम करत असताना ही दुर्घटना घडली. त्यांच्या अंगारच ही भिंत कोसळली. भिंत अंगावर कोसळल्याने त्याच्या ढिगाऱ्याखाली कामगार अडकले. यामध्ये दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघं गंभीर जखमी झाले.
30 फूटांची भिंत कोसळली
तर फेब्रुवारीत नालासोपाऱ्यात अनधिकृत बांधकामाची 30 फूट उंच भिंत कोसळली होती. चौधरी कंपाउंड मध्ये अनधिकृत गोदामाचं काम सुरू होतं. दोन ते तीन दिवसात ही घटना घडली. या दुर्घटनेत एक जण ठार झाला असून 4 ते 5 जण जखमी झाले.