अंजनगावं सुर्जी येथे श्री राम नवमी निमित्त काढण्यात आली भव्य शोभायात्रा

शोभयात्रेत डीजे साउंड ला तिलांजली
टाळ मृदूंगाचे, ढोल ताशांचे गजरात निघाली श्री राम नवमी शोभायात्रा
अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे
अंजनगाव सुर्जी येथे दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी शहरातील संगत संस्थान येथून १७ एप्रिल रोजी सायं सहा वाजता श्री राम नवमी निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते .
शोभायात्रेत शेकडोच्या संख्येने रामभक्त सहभागी झाले होते.संगत संस्थान येथे प्रभू श्री राम यांच्या मुर्तींचे पूजन करण्यात आले.यादरम्यान
श्री राम भक्तांनी रामनामाचा घोष करीत हनुमान चालीसा व रामस्त्रोताचे पठण करून टाळ मृदूंगाचे गजरात, ढोल ताशांचे गजरात प्रथमच डीजे साउंड ला तिलांजली देऊन ही शोभा यात्रा काढण्यात आली रामनामाच्या घोषणेने अवघा परिसर दुमदुमला.होता शोभायात्रा संगत संस्थान येथून तेलीपुरा,सावकारपुरा, सराफा लाईन,चावडी चौक,बालाजी चौक,शनिवार पेठ,पान अटाई ते विठ्ठल मंदिर मार्गे काढण्यात आली.विठ्ठल मंदिर येथे प्रभू श्रीराम यांचे पूजन करून शोभायात्रा ची सांगता करण्यात आली. विठ्ठल मंदिर येथे प्रभू श्री राम यांच्या मुर्तींचे पूजन करण्यात आले.यादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी शहरातील मुख्य चौकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.