क्राइम

अनैतिक संबंधात अडसर असलेल्या पतीचा असा काढला काटा 

Spread the love
 
खून केल्यावर मृतदेहा शेजारी प्रियकरा सोबत केले असे …
 

लखनऊ  / नवप्रहार डेस्क 


                   अलीकडच्या काळात  विवाहबाह्य संबंधात मोठी वाढ झाली आहे. चिंतनीय बाब अशी की आता आपसातच म्हणजे नातेसबंधातच अश्या घटना घडायला लागल्या आहेत. त्यामुळे अश्या प्रकरणाचा अंत फारच भयानक रित्या होत आहे. नातेसंबंधातील व्यक्ती सोबत रिलेशनशिप मध्ये असलेल्या पत्नीने त्याच्या सोबत मिळून पतीचा खून केला आहे. आणि त्याच्या मृतदेहा शेजारीच असे केले असल्याचे तपासात समोर आले आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करताना पोलिसांनी सांगितलं की, हत्येनंतर लगेचच पत्नीने मृतदेहाजवळच प्रियकरासोबत मस्ती केली. या प्रकरणाचा खुलासा करत हरदोई पोलिसांनी आरोपी प्रियकर आणि त्याच्या पत्नीला अटक करून कारागृहात रवानगी करून कारवाई केली आहे. हरदोई जिल्ह्यातील लोणार पोलीस स्टेशन हद्दीतील भडना गावात ही घटना घडली. येथे 12 एप्रिल रोजी चुटकुन्नू याचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत शेतात आढळून आला होता

मृतदेहाची सविस्तर तपासणी केली असता, मृताच्या डोक्यावर आणि डोळ्याजवळ तसंच कानाजवळ जखमेच्या खुणा आढळून आल्या. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केलं. या संपूर्ण प्रकरणात पोलीस खुनाचं कारण शोधत होते. फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा करताना काही पुरावे समोर आले.

हरदोईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मार्तंड प्रकाश यांनी सांगितलं की, हत्येचं कारण शोधत असताना पोलिसांना मृत चुटकुन्नूच्या पत्नीचे कुटुंबातीलच मधुर पाल याच्याशी संबंध असल्याची माहिती मिळाली. घटनास्थळाची सविस्तर तपासणी केली असता घटना घडल्यानंतर लगेचच घडलेल्या काही गोष्टी समोर आल्या. सखोल चौकशी केली असता, मृताच्या पत्नीने सांगितलं की, ती मधुरसोबत बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होती. याबाबत पतीला आक्षेप होता. या कारणावरून त्यांच्यात वाद होत होते.

वैतागून पत्नीने पतीच्या हत्येचा कट रचला आणि यामध्ये तिच्या प्रियकराने तिला पूर्ण साथ दिली. गहू काढणीच्या बहाण्याने तिने पतीला शेतात नेलं तिचा प्रियकर मधुर पाल तिथे आधीच उपस्थित होता. पती शेतात पोहोचताच मधुर पाल याने त्याच्यावर हल्ला केला आणि तो मरेपर्यंत मारहाण करत राहिला. पतीचा खून केल्यानंतर पत्नीने मृतदेहापासून काही अंतरावर प्रियकरासोबत हसत खेळत मस्ती केल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. याशिवाय पतीला ज्या रॉडने मारहाण करण्यात आली, तोही जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांनाही तुरुंगात पाठवले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close