वाशिम जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ
शेतकऱ्याचे अतोनात नुकसान शासनाकडून नुकसान भरपाई मिळवी.
डॉ. गुणवंत राठोड कारंजा प्रतिनिधी
वाशिम जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने व गारपीटमुळे सतत 8 दिवसापासून धुमाकूळ घातलेला आहे वाशिम जिल्ह्यात मागील 8 दिवसांपूर्वी अवकाळी पावसासह गारपिटीने तांडव घातले, तर त्यानंतरही अवकाळी पावसाची रिपरिप सुरूच असून, हा संपूर्ण आठवडा अवकाळी पावसाचाच राहील तसेच पुढील आठवड्यात सोमवार आणि मंगळवारीही अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात ८ आणि ९ एप्रिलदरम्यान अनेक भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. यात उन्हाळी पिके, रब्बी पिके, फळपिके तसेच भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले. प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार वाशिम, मंगरूळपीर, रिसोड आणि मालेगाव या चार कारंजा तालुक्यांतील ८० गावांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला. त्यात भरपूर क्षेत्रातील पिकांचे नुकसानही झाले. आता या पीक नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून करण्यात येत आहेत.
हे पंचनामे सुरू असताना
आठवड्यातील शनिवार आणि रविवार तसेच पुढील आठवड्यातील सोमवार आणि मंगळवार असे चार दिवस जिल्ह्यातील काही भागांत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. हा अंदाज खरा ठरल्यास शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीत अधिक भर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.आज पिवळा इशारा
हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान
झाले पुढील चार दिवस जिल्ह्यातील काही भागांत अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यात शनिवार १३ एप्रिल रोजीसाठी जिल्ह्यात येलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटासह काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेतकरी व शेतमजुरांसह नागरिकांनी या काळात खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.