उन्हा पासुन वाचण्यासाठी बांधलेला स्कार्फ ठरला ‘ मौत का फंदा
बीड / नवप्रहार मीडिया
उन्हाच्या तिव्रतेपासून वाचण्यासाठी लोकं स्कार्फ किंवा दुपट्ट्याचा उपयोग करतात. आता तर मुली जवळपास सगळ्याच ऋतूत तोंडाला स्कार्फ बांधून असतात. उन्हापासून बचाव करण्यासाठी एका मजूर वृद्ध महिलेने डोक्याला स्कार्फ गुंडाळला होता. आणि हाच स्कार्फ तिच्या मृत्यूचे कारण ठरला. चला तर जाणून घेऊ या नेमक काय घडलं.
महिलेचं डोकं धडावेगळं झालं. उन्हापासून वाचण्यासाठी डोक्याला स्कार्फ बांधताच महिलेचा मृत्यू झाला आहे.
बीडमधील ही धक्कादायक घटना आहे. पाटोदा तालुक्यातील डोमरी गावातील ही महिला. अंजना श्रीधर जगताप असं तिचं नाव. तिचं वय 55 वर्षे. अंजना शेतकरी होत्या. शेतात काम करताना उन्हाचा चटका जाणवतो. या उन्हापासून वाचण्यासाठी लोक महिला, पुरुष डोक्याला रूमाल किंवा स्कार्फ बांधतात. अंजनानंसुद्धा डोक्याला स्कार्फ बांधला. पण तो तिच्यासाठी जीवघेणा ठरला.
डोमरीत शेतकरी सध्या ज्वारी, गहू हरभऱ्याचे खळे करण्यात व्यस्त आहेत. यासाठी मळणीयंत्र लावले जाते. अंजनासुद्धा तिथंच काम करत होत्या. काम करताना अचानक डोक्याचे स्कार्फ सुटलं आणि मळणीयंत्रात अडकलं. वेगाने सुरू असलेल्या यंत्रणानं अंजना जगताप यांना खेचलं. अंजना यांचं डोकं मशीनमध्ये अडकलं आणि धडावेगळं झालं. काही समजण्याच्या आतच या महिलेचा मृत्यू झाला.
औरंगाबादमध्ये घडली होती अशीच घटना
2022 साली औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात अशीच घटना घडली होती. कुटुंबीयांसोबत आपल्या शेतात मळणीचं काम करणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला होता.
कविता अरुण दरेकर मृत महिलेचं नाव. मळणी यंत्रणाजवळ जमा झालेला भुसा काढण्यासाठी ती खाली वाकली तेव्हा तिचा स्कार्फ मळणी यंत्रात अडकला. मळणी यंत्रात स्कार्फ अडकल्यानं केसासहित त्यांचं डोकं मळणी यंत्रात ओढलं गेलं. यावेळी आसपास उपस्थित असणाऱ्या कुटुंबीयांनी तातडीनं मळणी यंत्र बंद करून महिलेला बाहेर काढलं पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तिला त्वरित जवळच्या एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं. पण डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यानं तिचा मृत्यू झाला.
महिलेचा ओढणीने घेतला जीव
स्कार्फच नाही तर ओढणीनेही असा जीव जाण्याचा धोका असतो. ऑगस्ट 2023 मध्ये बुलेटच्या चाकात ओढणी अडकून गळ्याला फास लागल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईत घडली होती. प्रतिमा यादव असं मृत महिलेचं नाव. कांदिवलीहून वसईच्या तुंगारेश्वर येथील महादेवाचे दर्शन घेण्यासाठी ती आपल्या पतीसोबत बुलेटवर जात होती. दर्शन घेऊन परतताना दोघंही मुंबई अहमदाबाद महामार्गावरून वसई बाफाणे हद्दीत आले असताप्रतिमाच्या गळ्यातील ओढणी बुलेटच्या पाठीमागील चाकात अडकली. ती गाडीच्या चाकात गुंडाळली गेली आणि तिच्या गळ्याला फास लागला. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.