आध्यात्मिक
येणाऱ्या काळात कोणत्या राशीवर असेल शनीची कृपादृष्टी आणि वक्रदृष्टी
नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया
ज्योतिषशास्त्रात शनीला न्याय आणि कर्माची देवता मानलं जातं. शनी दर अडीच वर्षांनी राशिपरिवर्तन करतो. साडेसाती किंवा अडीचकी म्हटलं की अनेकांना भीती वाटते. अर्थात त्यामागे कारणही तसंच आहे. साडेसातीचा कालावधी त्रासदायक असतो, असा समज आहे. शनी सध्या कुंभ या स्व राशीत गोचर करत आहे. त्यामुळे मकर, कुंभ आणि मीन राशीला साडेसाती सुरू आहे. तसंच कर्क आणि वृश्चिक राशीला अडीचकी सुरू आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच 2025मध्ये शनी राशिपरिवर्तन करणार आहे. त्यामुळे काही राशींची साडेसाती, अडीचकी संपणार असून, काही राशींना साडेसाती सुरू होईल.
वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला कर्मफलदाता आणि न्यायदेवता मानलं जातं. व्यक्ती जसं कर्म करतात शनी त्यानुसार त्यांना फळं देतात. चांगलं कर्म केलं तर शुभ आणि वाईट कर्म केलं तर अशुभ फळ मिळतं. शनी हा मंद गतीने गोचर करतो. त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी अडीच वर्षं लागतात. शनीने राशिपरिवर्तन केलं की काही राशींना साडेसाती सुरू होते, तर काहींची संपते. जानेवारी 2024मध्ये शनीने कुंभ राशीत प्रवेश केला. या वर्षी शनी कुंभ राशीत असेल. त्यामुळे मीन राशीला साडेसाती सुरू झाली आहे. सध्या मकर, कुंभ आणि मीन राशीला साडेसाती सुरू असून, कर्क आणि वृश्चिक राशीला अडीचकी सुरू आहे. येत्या दहा वर्षांत शनीचं गोचर, साडेसाती आणि अडीचकीची स्थिती बदलणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, सध्या शनी कुंभ या स्वराशीत आहे. मीन राशीला साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. 8 ऑगस्ट 2029ला मीन राशीची साडेसाती संपेल. कुंभ राशीला साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे. 3 जून 2027ला कुंभ राशीची साडेसाती संपेल. मकर राशीला साडेसातीचा अंतिम टप्पा सुरू असून, 29 मार्च 2025 रोजी या राशीची साडेसातीतून मुक्तता होईल. शनी कुंभ राशीत असल्याने कर्क आणि वृश्चिक राशीला अडीचकी सुरू आहे. 2025मध्ये या राशींची अडीचकीमधून सुटका होईल.
( सा.नवप्रहार या गोष्टीचे समर्थन करीत नाही. ग्रह आणि राशी च्या दृष्टिकोनातून जोतिष्यांनी हा अंदाज वर्तविला आहे.)