Uncategorized

ऍड . सि. हिरा पारखे   महाराष्ट्राच्या आजच्या जिजाऊ पुरस्काराने सन्मानित

Spread the love

 

 अंजनगाव सुर्जी मनोहर मुरकुटे

 

 दरवर्षि प्रमाणे ह्याही वर्षी नंबर वन न्युज चॅनल अमरावती व्दारा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलाना त्यांच्या अतुलनिय कार्यासाठी देण्यात येणारा महाराष्ट्राच्या  आजच्या जिजाऊ  गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळा नुकताच दिनांक 12 मार्चला डाॅ. पंजाबराव देशमख कृषि विधापिठ अकोला येथे विस्तार शिक्षण संचालनालय अकोला येथे पार पडला.

      ऍड . सिस्टर हीरा पारखे मातृछाया सोशल सेंटर भंडारज येथे कार्यकारी संचालिका म्हणुन सद्या कार्यरत असून . त्यांनी गेल्या 23 वर्षांमध्ये अमरावती, अकोला , ठाणे या तीन जिल्ह्यातील कतकारी, वारली, कोरकु ,पारधी आणि इतर मागासवर्गीय, मधील तळागाळातील गोरगरीब,, निर्वासित, लोकांच्या सर्वागीण विकासासाठी व सक्षमीकणासाठी त्यांचें जीवनमान उंचविण्या साठी अहोरात्र काम केले . विस्थापितांना सक्षम करण्यासाठी त्यांनी गेल्या 23 वर्ष गोरगरिबांची उत्कृष्टपणे निस्वार्थ सेवा केल्याबद्दल त्यांना संपुर्ण महाराष्ट्र राज्यातून महाराष्ट्राच्या आजच्या जिजाऊ या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले आहे.  

ह्याप्रसंगी पुरस्कार वितरण कार्यक्रमाला मा. डाॅ. उंदिरवाडे संचालक कृषि विस्तार शिक्षण संचालनालय , डाॅ. पंजाबराव देशमुख कृषि. विधापिठ अकोला, मा. प्रकाशदादा साबळे जि.प.माजी सदस्य अमरावती, डाॅ. दिलीप काळे माजी प्राचार्य समाजकार्य महा. बडनेरा, याचे सह पोर्णिमाताई सवाई, इंजी मनोज जयस्वाल, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झिंगुबाई बोलके, गजाननदादा कळु, दिपाताई तायडे, नितीन ऊभाड, मा. प्रा. संजिव सलामेमा. सुहास मोरे, अश्विनीताई गीते दिनेश सावरकर हे मंचावर ऊपस्थित होते तर कार्यक्रमाचे

आयोजन नंबर वन न्युज चॅनल अमरावती चे नितीन पाटिल मुळे यांनी केले.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Pande Sanjay

Related Articles

Back to top button
Close
Close