क्राइम

मुलाने दिली वडिलांच्या हत्येची सुपारी

Spread the love

मनासारखे पॉकेट मनी देत नाही म्हणून होता नाराज 

प्रतापगड / नवप्रहार मीडिया 

                 तरुणात व्यसनाधीनता वाढल्याने आणि त्यासाठी पैसे कमी पडत असल्याने तरुण वाम मार्गाला लागल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. वडिलां कडून खर्चासाठी हवे तितके पैसे मिळत नसल्याने मुलाने वडिलांच्या हत्येची सुपारी देऊन हत्या केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे.

16 वर्षांच्या मुलाने संतापाच्या भरात वडिलांना संपवण्याची जबाबदारी तिघांकडे दिली होती. यासाठी मुलाने आरोपींना दीड लाख रुपयेदेखील दिले होते. आरोपींना अटक झाल्यानंतर पोलिसांच्या चौकशीत हा सगळा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे हत्येसाठी मुलाने आरोपींना तब्बल सहा लाख रुपये देण्याचे मान्य केले होते. हत्येआधी मुलाने आरोपींना दीड लाख रुपयेदेखील दिले होते. वडील खर्चासाठी हवे तेवढे पैसे देत नव्हते. त्यामुळे मुलाने त्यांना संपवण्याची योजना आखल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी याप्रकरणी हत्या करणाऱ्या आरोपींसह अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पट्टी भागात तीन बाईकस्वार आरोपींनी व्यावसायिक मोहम्मद नईम यांची गोळी मारून हत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी पीयूष पाल, शुभम सोनी आणि प्रियांशु यांना अटक केली होती.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close