*विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या जिल्हा सहकार्यवाह पदी गुलाब सोनोने यांची निवड..
यवतमाळ वार्ता
अरविंद वानखेडे
नुकत्याच झालेल्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या निवडणुकीमध्ये इंग्लिश हायस्कूल चिंचगाव येथील सहा.शिक्षक गुलाब सोनोने यांची सहकार्यवाह पदी अविरोध निवड करण्यात आली.
ते सन २००० पासून संघाचे आजीव सभासद आहेत, कवी, लेखक, गझलकार असून संशोधनाचे कार्य करीत आहे.. संघटना मजबूत होण्यासाठी त्यांच्या कविता प्रकाशित होत असतात.श्री सोनोने मराठी विषयाचे उत्कृष्ट मार्गदर्शक आहेत.त्यांच्या लेखणीतून पेलनी व सोनगाणी ही दोन काव्यकृती प्रकाशित आहेत, विविध दिवाळी अंक वर्तमानपत्रात त्यांचे लेख, कविता, गझल, शैक्षणिक लेख, सातत्याने प्रकाशित होत असतात.. विशेषत शैक्षणिक क्षेत्रामधील लेखांचे त्यांचे मोलाचे योगदान आहे.विद्यार्थीवर्ग आणि मराठी भाषा तज्ञ त्यांच्या लेखाचा लाभ घेत असतात.त्यांच्या निवडीने शिक्षक वर्ग तसेच मराठी भाषा तज्ञाकडून सर्व स्तरावर स्वागत होत आहे. माजी आमदार डायगव्हाणे सर, प्रांतिक कार्यवाह विद्यमान आमदार सुधाकरजी अडबाले, प्रांतिक अध्यक्ष अरविंदजी देशमुख, मुख्य मार्गदर्शक मुरलीधर धनरे, मनोज जीरापुरे, कार्याध्यक्ष विजय खरोडे, आनंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष पवन बन, कार्यवाह रामकृष्णजी जीवतोडे इत्यादी मान्यवरांनी त्यांच्या अविरोध निवडीचे स्वागत केले आहे..