हटके

दहशतवादी संघटना इसिस च्या  मार्गावर निघालेल्या विद्यार्थ्याला अटक 

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया

                उच्चशिक्षित तरुणांच्या डोक्यात विष कालवून त्यांना आपल्या संघटनेत सहभागी करून घेण्यासाठी अनेक दहशतवादी संघटना प्रयत्नशील असतात.उच्चशिक्षित विद्यार्थ्यांचा उपयोग ते नवीन टेक्नॉलॉजि चा उपयोग करून घेण्यात करतात.  दहशतवादी संघटना ISIS मध्ये सहभागी होण्यासाठी निघालेला आयआयटी गुवाहाटीच्या एका विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. हा विद्यार्थी दिल्लीच्या ओखला येथील राहणारा असल्याचे सांगितले जात आहे.

या विद्यार्थ्याचा आयएस इंडिया प्रमुख हारिश फारुकी उर्फ हारिश अजमल फारुखी आणि त्याता सहकारी अनुराग सिंह उर्फ रेहान याच्या अटकेनंतर ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिस मगहानिदेशक जीपी सिंह यांनी एक्सवर पोस्ट केली आहे की, आयएस प्रति निष्ठा जाहीर केल्याप्रकरणी आयआयटी गुवाहाटीच्या विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. तो दहशतवादी संघटनेत सहभाग होण्यासाठी निघाला होता. एसटीएफचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक कल्याण कुमार पाठक यांनी सांगितले की इमेल मिळाल्यानंतर आम्ही याचा तपास सुरू केला. हा मेल विद्यार्थ्याने पाठवला होता.ज्यामध्ये त्याने दावा केला होता की तो आयएसमध्ये सहभागी होण्यासाठी जात आहे.

पाठक यांनी सांगितलं की यानंतर लगेच आयआयटी गुवाहाटीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. त्यांना हा विद्यार्थी शनिवार दुपासपासून बेपत्ता आहे. तसेच त्याचा फोन देखील बंद आहे. त्यांनी सांगितलं की तो विद्यार्थी दिल्लीच्या ओखला येथील रहिवासी आहे. त्याला स्थानिक लोकांच्या मदतीने गुहावटीपासून तब्बल ३० किलोमीटर दूर हाजो परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

पाठक यांनी सांगितलं की प्राथमिक चौकशीनंतर त्याला एसटीएफ कार्यालयात आणण्यात आले, त्याच्या हॉस्टेलच्या खोलीमधून आयएस प्रमाणे दिसणारा एख काळ्या रंगाचा झेंडा अढळून आला आहे. तसेच जप्त केलेल्या सामानाची तपासणी केली जात असल्याचे देखील पाठक यांनी सांगितले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close