देतो तो देव…. म्हण काहीशी खरी ठरतांना दिसतेय !
समाजसेवी नितीनजी कदम यांच्या स्तुस्त्य उपक्रमाची साखळी सुरूच
प्रतिनीधी / अमरावती
*आपण आचार्य विनोबा भावे यांचा ‘देतो तो देव’ हा धडा पुस्तकांमधून कदाचित वाचला असेलही परंतु ती म्हण आता काहीशी समाजसेवी नितीनजी कदम यांच्या सामाजिक कार्यातून खरी होतांना दिसून येत आहे. नुकतेच नवदुर्गा उत्सव विसर्जन कार्यक्रम बडनेरा शहर व ग्रामीण भागामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होत असताना नितीनजी हे मंडळांना भेटी देत असताना त्यांची गोरगरीब अपंग बांधवाच्या व्यथा जाणून घेण्याची जिज्ञासा कुठेतरी त्यांचा मनाला व्याकूळ करते. दररोज विविध माध्यमांद्वारे आपल्याला नितीनजी यांच्या सामाजिक सेवाकार्याची महिती मिळतच राहते.गेल्या कित्येक वर्षापासून त्यांच्या या सामाजिक कार्याची साखळी मालिका निरंतर सुरूच आहे.दिव्यांग, निराधार, गोरगरीब जनसामाण्य नागरिकांच्या सेवेकरिता नितीनजी यांनी संपूर्णपणे स्वतः ला सामावून घेतलंय.त्यामुळे त्यांच्या बडनेरा शहर व ग्रामीण भागातील लोकप्रियता वाढतांना दिसून येत आहे.दरम्यान भातकुली तालुक्यांतील खलाकोनी गावामध्ये नवदुर्गा उत्सव मंडळांना भेटी देतं असताना २ अपंग बांधव नितीनजी यांना भेटून आपल्या अपंगत्वाची समस्या घेऊन आले. नितीनजी यांनी वस्तूपरिस्तिथीचा आढावा घेत क्षणाचाही विलंब न करता दोन स्वयंचलित अत्याधुनिक संसाधनउक्त सायकलीची व्यवस्था करून दिली. त्यामुळे अपंग बांधव व गावकरी भाऊक झाले. एवढ्या तातडीने मदत उपलब्ध करून देणार नितीनजी हे कदाचित पहिलंच व्यक्तिमत्त्व !*
*त्यांच्या या सेवाकर्याचे सर्व भातकुली परिसरात कौतुक होतांना दिसून येत आहे.*