जल ही जिवन है !

२१ मार्च-
आंतरराष्ट्रीय जलदिवस
पाण्या विषयी अत्यंत महत्वाची माहिती:
आपण खाण्याविषयी रोजच बोलत असतो. पण आज पाण्याविषयी बोलूया
आज एक गोष्ट share करविशी वाटते
इतर सर्व जणां प्रमाणे अनेकांना सुद्धा स्वयंपाक घर लख्ख केल्याशिवाय झोप येत नाही.
पण स्वच्छ करून झाल्या नंतर,गेले सहा महिने मी एक गोष्ट आवर्जून करते, ज्याचा मला प्रचंड फायदा झाला आहे..
रात्री झोपताना मी स्वयंपाक घरातील असलेल्या देवघरा मध्ये संध्याकाळी लावलेला दिवा जर विझला असेल, तर तो तर लावतेच,
पण त्या सोबत, पिण्याच्या पाण्याच्या भांड्यांजवळ देखील एक दिवा लावते, आणि ज्या दिवशी शक्य असेल, त्या दिवशी एक फूल देखील तेथे वाहते आणि मनोभावे पाण्याच्या सर्व भांड्यांना हात जोडून *कृतज्ञता* व्यक्त करते.
वाचताना काही जणांना हे विचित्र वाटू शकेल, कोणाला हास्यास्पद वाटेल.
पण मी स्वतः एक डॉक्टर आहे. विज्ञानाच्या परीक्षेतून तावून सुलाखून बघितल्या शिवाय सहसा कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. पण सहा महिन्यांपूर्वी “पाणी” या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण असे संशोधन माझ्या हाती लागले आणि त्या नंतर चक्क काही धार्मिक पुस्तकां मध्ये त्याचे जसेच्या तसे संदर्भ देखील मिळाले..
ते सोप्यात सोप्पे करून खाली देत आहे..
नक्की वाचा..
१)पाणी…
म्हणजे जीवन..
पाण्याला स्वतःची विशिष्ट अशी एक *स्मरणशक्ती* असते,
२)पाणी पिताना ज्या प्रकारचे आपले विचार असतात, किंवा ज्या मानसिक स्थिती मध्ये आपण पाणी पितो,त्याचा प्रचंड परिणाम पाण्यावर आणि पर्यायाने आपल्यावर होतो..
३)पाण्यामध्ये बाहेरून येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या ऊर्जे प्रमाणे बदल होत असतात, आणि त्या बदला प्रमाणे ते तुमच्या शरीरावर परिणाम करत असते .
४)पाणी हे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे कार्य करते. आपल्या शरीराचा जवळपास ७१% भाग हा पाण्याने बनलेला आहे.म्हणजेच, शरीराचे कार्य कसे चालावे हे मुख्यत्वे आपण जे पाणी ग्रहण करतो, तेच ठरवत असते.
५)पाणी पितानाचे तुमचे विचार, पाण्याकडे बघण्याची तुमची दृष्टी किंवा नजर, पाणी पिताना आजूबाजूला येणारे आवाज, पाणी पिताना तुमच्या मनातील भावना किंवा तुमच्या तोंडातून निघणारे उच्चार या सर्वांचा पाण्यावर प्रचंड परिणाम होतो.. आणि जे प्रत्यक्षात मायक्रो स्कोप खाली बघता सुद्धा येते.
६) तुमची मानसिक स्थिती जर प्रचंड सकारात्मक असेल, आणि हातातील पाण्या विषयी जर तुम्ही प्रचंड *कृतज्ञ* असाल, तर गढूळ किंवा दूषित पाणी देखील तुम्हाला काहीही अपाय करू शकत नाही; आणि तुमची मानसिक स्थिती नकारात्मक असेल आणि पाणी पिताना जर तुम्ही पाण्या विषयी बेफिकीर असाल तर अतिशय शुध्द पाणी देखील प्रचंड अपाय कारक ठरू शकते.
७)पाणी हे “जीवंत” असून, मानवाची मज्जासंस्था ज्या प्रमाणे कार्य करते, त्याप्रमाणे पाणी आणि त्याची “पेशीसंस्था” कार्य करते.
८) जे पाणी हातात धरून किंवा जवळ ठेवून प्रेमाच्या भावना मना मध्ये आणल्या जातात, त्या पाण्याच्या पेशींचा किंवा कणांचा (molecule) आकार खूपच सुंदर असतो, आणि जे पाणी हातात धरून किंवा जवळ ठेवून राग किंवा द्वेष अशा भावना मनात आणल्या जातात, त्या पाण्याच्या कणांचा आकार खूपच विचित्र आणि ओबड धोबड असतो.
९) ज्याप्रकारे पाणी पिताना तुम्ही पाण्याला “ट्रीट” करता, पाणी ते खूप जास्त काळापर्यंत *लक्षात ठेवते* आणि त्याप्रमाणे तुमच्या शरीरावर चांगले किंवा वाईट परिणाम करते.
१०) पाण्याचा विचार सध्या *liquid computer* म्हणून देखील केला जात असून त्यामध्ये पाण्याचा *लक्षात ठेवणे (memory)* हा गुणधर्म वापरला जात आहे.
११) तुम्हाला जो काही चांगला उद्देश साध्य करायचा आहे, “तो उद्देश एका हातात पाण्याचा ग्लास घेऊन मग मनामध्ये बोलून मग ते पाणी पिणे” या सारख्या विविध *Water Therapy* सध्या पाण्याच्या याच गुणधर्मांचा वापर करून उदयास येत आहेत.
१२) ही सगळी वैज्ञानिक माहिती असून, ज्यांना अजून डिटेल माहिती पाहिजे असेल, त्यांनी नेट वरून डॉ. मासारू इमोटो यांचे पाण्यावरील संशोधन शोधून वाचावे.
तर आता..
या पाण्याच्या
*दिव्य आणि शक्तिशाली*
क्षमतांची सांगड आपल्या संस्कृती आणि चालिरितींशी घालण्याचा प्रयत्न केल्यावर जे काही हाती लागले, त्यावरून मी खालील गोष्टी गेली सहा महिने करीत आहे.
१)पिण्याचे पाणी तांब्याच्या भांड्यात ठेवूनच साठवावे..
आणि शक्यतो तांब्याच्या ग्लास ने च प्यावे. कारण तांबे हा धातू ऊर्जेचा “सुवाहक” आहे.
२)रोज रात्री ते तांब्याचे भांडे चिंच आणि हळद वापरून धुवावे.
३)त्यानंतर त्यामध्ये स्वच्छ पाणी सुती कपड्यामधून गाळून भरावे.
४) यानंतर या पाण्याच्या भांड्याच्या बाजूला एक दिवा लावून भांड्यावर एक फुल ठेवावे, आणि पाण्या विषयी मनामध्ये अत्यंत
*कृतज्ञतेचे भाव*
आणून हात जोडावेत.
(आम्हाला आयुष्य, आरोग्य आणि जीवन प्रदान केल्याबद्दल आभारी आहोत असे किंवा या प्रकारचे कोणतेही चांगले विचार मनात आणून कृतज्ञता व्यक्त करू शकता.)
५) सकाळी उठल्या नंतर याच भांड्यातील पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करावी.
६)पाणी पिण्याचा सर्वात योग्य मार्ग म्हणजे दोन हातांच्या ओंजळीत घेऊन पिणे..
परंतु ते आपल्याला शक्य नसते. त्यामुळे पाणी पिताना, ज्या भांड्यामध्ये, किंवा पेल्यामध्ये प्याल, तो दोन्ही हातांनी पकडून पाणी पिणे.
७) पाणी पिताना जाणीवपूर्वक काही सेकंद पाण्याचा ग्लास दोन्ही हातात धरून मनामध्ये चांगले विचार, चांगल्या भावना आहेत याची *खात्री* करूनच पाणी प्यावे.
८) हीच गोष्ट कोणाच्या घरी गेल्यावर किंवा बाहेर गेल्यावर कुठले पाणी पिण्याची वेळ आली तर जाणीव पूर्वक थोडी जास्त वेळ करावी.
९)केवळ तहान लागल्यावरच पाणी प्यावे. सारखे सारखे विनाकारण पिऊ नये. 🥛
१०)आहारामध्ये पाणी जास्त प्रमाणात (८०-९०%) असलेल्या घटकांचा म्हणजेच फळांचा..
जास्तीत जास्त समावेश करावा..
या प्रकारे पाणी पिण्यामुळे आणि वर दिलेल्या सर्व गोष्टी गेले सहा महिने सलग केल्यामुळे *पहिल्या दिवसा पासून* झालेले फायदे.:
१) माझी लहान मुलगी, जी दर महिन्याला आजारी पडत होती, आणि तिला अँटिबायोटिक्स दर महिन्याला द्यावे लागत होते, ते पूर्ण बंद झाले.
२) माझे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य खूप चांगले झाले, जे काही महिन्यांपूर्वी प्रचंड बिघडलेले होते.
३) माझ्या घरातील लोकांचा acidity चा त्रास जवळपास बंद झाला आहे.
४)रोज सकाळी घरातील वातावरण खूपच छान, हसते खेळते आणि ऊर्जेने भरलेले असते .
५)माझा पाण्याकडे, आणि एकूणच स्वयंपाक घराकडे बघण्याचा दृष्टीकोन प्रचंड बदलला आहे.
६)एखादे दिवशी दिवा लावायचा विसरला, तर पाण्याच्या चवीमध्ये जाणवण्या इतका फरक असतो.
७) माझ्या लहान मुलीला देखील मी ही सवय लावली आहे. आणि ती या गोष्टी आनंदाने करते.
Forwarded post
*टीप*: या पोस्ट चा उद्देश माझे अनुभव शेअर करणे हा आहे. अशा पद्धतीने पाणी पिण्यास सुरुवात केल्यास तुम्हाला देखील आत्ताच नव्हे, तर कायम साठी निरोगी राहण्यासाठी याचा फायदा होऊ शकेल या इच्छेने ही पोस्ट केलेली आहे.
याला अंधश्रद्धा समजण्याचा प्रश्न येत नाही, कारण हे सर्व वैज्ञानिक आणि तार्किक रीतीने सिद्ध झालेले मुद्दे आहेत.
आपली तीर्थ क्षेत्रे, किंवा नद्यांचे कुंड किंवा देवळांमध्ये दिले जाणारे तीर्थ किंवा जेवण पूर्वी पाण्याने पाच वेळा घेतली जाणारी अपोष्णी…
हे सर्व काही आपल्या संस्कृतीने पुरातन काळापासून पाण्याच्या अमर्याद अफाट आणि जीवंत शक्तीच्या अभ्यासातूनच आपल्यापर्यंत पाण्याचे महत्त्व आणि फायदे पोहोचवण्यासाठी तयार केलेले प्रकार आहेत. त्याची जाणीव ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.
स्वयंपाक घरातीलच काय, आयुष्यातील एकही काम पाण्याशिवाय होऊ शकत नाही, त्यामुळे आजपासूनच पाण्याची ही शक्ती जाणवून घ्या, आणि तिचा पुरेपूर वापर करण्यास सुरुवात करा.