राजकिय

रक्तदान करुन कार्यकर्ते करणार वर्धा लोकसभा निवडणुक लढण्याकरीता बच्चुभाऊ कडू यांना विनंती..

Spread the love
वर्धा / आशिष इझनकर 
            वर्धा लोकसभा निवडणूक लढण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आ. बच्चू उर्फ ओमप्रकाश कडू यांना विनंती करणार असल्याची माहिती प्रहार जिल्हाध्यक्ष विकास दांडगे यांनी पत्रकार परिषद घेऊन कळविले आहे.
प्रहार कार्यकर्त्यांच्या मते 2024 लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वर्धा लोकसभा क्षेत्रातील सध्याची स्थिती पाहता कुठलाही तगडा उमेदवार निवडणुकीत नाही. मागील 10 वर्षापासून वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार यांचे जर कार्य पाहीले तर विकासाच्या दृष्टीने चांगले नाही. 2024 लोकसभा ही प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार श्री. बच्चुभाऊ कडू यांनी लढवावी अशी संपुर्ण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्याकरीता आज जिल्हा अध्यक्ष यांनी  पत्रकार परिषद बोलावली होती. त्यांच्या मते मागील अनेक वर्षापासून हा मतदार संघ विकासाच्या दृष्टीने रोजगाराच्या दृष्टीने वंचीत राहीलेला आहे. जिल्ह्यातील अनेक युवक रोजगाराकरीता मुंबई, पुणे व इतर राज्यात जात आहे. मतदार संघातील  शेतकऱ्यांचीही परिस्थीती अतिशय बिकट आहे. सिंचनाचे प्रकल्प , पुनर्वसनाचे अनेक वर्षापासूनचे प्रश्न प्रलंबीत आहे. या सर्व प्रश्नांवर आवाज उठविण्याकरीता आम्ही सर्व कार्यकर्ते मिळुन मा. बच्चुभाऊ कडू यांना विनंती करतो की, त्यांनी हा लोकसभा मतदार संघ लढावा जेणेकरुन सोळा लाख पन्नास हजार मतदारांना न्याय मिळेल असे दांडगे यांनी यावेळी सांगितले.
मा. बच्चुभाऊ यांच्या रुपाने या लोकसभा मतदार संघात एक दमदार उमेदवारी व राज्यपातळीवरचा चेहरा या मतदार संघात मिळू शकतो. मा. बच्चुभाऊंचे कार्य जिल्ह्याला व संपुर्ण राज्याला माहीती आहे. लोकांच्या प्रती काम करण्याची त्यांची तळमळ शेतकऱ्यांसाठीचा एक बुलंद आवाज म्हणून त्यांची ओळख आहे. विधानसभेमध्येही ज्या प्रकारे ते वंचीत दुबळ्यांची लढाई लढतात हे आपणास सर्वांना माहीती आहे. शेतकऱ्यांकरीता आणि दिव्यांग बांधवाकरिता त्यांची लढाई  गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत पोहचली आहे. तोच आवाज आता दिल्ली मध्ये गाजण्याकरीता बच्चुभाऊंनी ही उमेदवारी स्विकारावी व वर्धा लोकसभा क्षेत्रातून लढवावी अशी इच्छा संपुर्ण लोकसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आहे. त्याकरीता दिनांक 24/03/2024 ला दुपारी 12.00 वाजता मगन  संग्रहालय बॅचलर रोड येथे वरुड, मोर्शी, धामणगांव (रेल्वे), चांदुर रेल्वे व वर्धा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची एक महत्वाची बैठक (सभा) आयोजित केली आहे. त्या दरम्यान सर्व कार्यकर्ते हे रक्तदान करणार असून त्या ठिकाणी सर्वानुमते एक ठराव पारीत करण्यात येईल. सर्वांचे मत जाणुन घेतल्यानंतर संपुर्ण ठराव हा सन्माननीय बच्चुभाऊ कडू यांच्यासमोर ठेवण्यात येईल व त्यांना विनंती करण्यात येईल की, त्यांनी ही लोकसभा लढवावी व साडे सोळा लाख मतदारांना न्याय मिळून द्यावा याकरीता सर्व कार्यकर्ते मिळून ही विनंती करण्यात येत आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close