जि.प.उच्च प्राथमिक शाळा कोपरी येथे स्वच्छता दूत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी.
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
चलो चलो रे भाई करे ग्राम सफाई म्हणत ग्राम स्वच्छता सोबत भजन किर्तन च्या माध्यमातून लोकांच्या मनातील घान साफ करणारे स्वच्छता दूत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी आज दिनांक २०/१२/२०२३ रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोपरी खुर्द येथे साजरी करण्यात आली. विद्यार्थी सोबत शिक्षकांनी हाती खराटा घेत भजन गात ग्राम सफाई केली. कार्यक्रम सूरवात गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली.नंतर विद्यार्थी, शिक्षक वृंद व गावातील नागरिक यांनी संपूर्ण गावाची स्वच्छता केली त्याच बरोबर शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या गोड शब्दातुन गाडगेबाबां बद्दल माहिती दिली.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश बोपटे सर ,मुकेश पसावत स.शिक्षक,सौ. वसुले मॅडम आनंद कोडापे शिक्षण प्रेमी, मुकुंद बुरकुंडे ग्रा.प. सदस्य, पंकज मांडवगोडे,सुधाकर पांगुळ
व गावातील इतर नागरिक विद्यार्थी उपस्थित होते.