आचारसहीता भंगच्या धास्तिने बॅनर काढण्यासाठी धावपळ

बॅनर मुक्ततेणी घाटंजीने घेतला मोकळा स्वास
घाटंजी ता प्रतिनिधि- सचिन कर्णेवार
घाटंजी शहरातील मुख्य रोड व आजबाजुचे पोल वरिल जागोजागी भाई का बड्डे वाढदिवसा पासून ते नेत्यांचे आगमन, सण, उत्सवाच्या शुभेच्छांचे जागोजागी उभारण्यात आलेल्या बॅनर्स,पोस्टर्सने शहराचा चेहराच विद्रुप होऊंन घाटंजीचा मोकळा स्वास या बॅनरणी गुदमरला होता. मात्र आता आचारसंहिता भंगाच्या धास्तीने रविवार १७ मार्च च्या पहाटेपासून राजकिय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच न. प.पालिका प्रशानानेही बॅनर व पोस्टर्स हटवण्यास धावपळ चालवली.आचार संहिता भंगाची धास्ती असल्यामुळे हवसे गवसे यांनी लावलेले बॅनर हटवल्याणी शहराचा श्वास मोकळा झाला आहे. घाटंजी शहरातील मुख्य रस्ता शिवमंदीर,गिलानी कॉलेज ते पोलिस स्टेशन चौक,इंदिरा चौक, शिवाजी चौक, पोलिस स्टेशन पर्यंत बाबासाहेब कॉलनी ते पारवा पॉईन्ट बसस्थानक ते यवतमाळ रोड या ठिकाणी आपले आपले वर्चस्व दाखवण्यासाठी मोठ्या संख्येने बॅनर लावले जातात.बॅनर बाजी ने शहराचा चेहराच विद्रूप झाला होता. यामध्ये वाढदिवस, नेत्यांच्या आगमनासाठी शुभेच्छा, शासकिय योजना व माहीतीचे कमी न पक्षाचा प्रचार अजेंडा, सण,उत्सवाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले होते कासी बॅनर २० ते ३० फुट उंचीचे देखील काही भागात लावले होते. लावलेले बॅनर कार्यक्रम झाला तरी काढण्याची तसदी ही मंडळी घेत नाहीत. बॅनरबाजीमुळे रस्ते अरुंद होत असून अनेक वेळा अपघातही घडले आहेत.आता लोकसभा निवडणुकीची अचारसंहिता लागल्याने का होईना राजकिय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शहरात लावलेले बॅनर, फलक काढण्यास सुरवात केली आहे. या शिवाय पालिका प्रशासनानेही ज्या ठिकाणी राजकिय मंडळींचे बॅनर आहेत त्या ठिकाणचे बॅनर उतरविण्यास सुरवात केली आहे. सकाळ पासूनच बॅनर उतरविण्यासाठी धावपळ सुरु होऊन शहरातील बहुसंख्य बॅनर उतरविण्यात आल्याने घाटंजी शहराने मोकळा श्वास घेतला.