घाटंजी न.प. ची अनाधिकृत बाजारातील अतिक्रमण दूकान धारकावर कार्यवाही..
..
घाटंजी ता प्रतिनीधी-
नगर परिषदकार्यालय, घाटंजी जि.यवतमाळ सध्या नगरपरिषद जागेतील वाहतूक व बाजारास अडथळा ठरणा-या अतिक्रमण धारक दू कानावर बडगा उगारला असून दिनांक १७/०५/२०२४
ररोजी अतिक्रमण तात्काळ काढणेबाबत स्वतः मुख्याधिकारी राजू मोट्टेमवार हजर राहून घाटंजी बाजाराचे ठीकाण व कन्या शाळा मागील परिसरातील थाटलेली दूकान हटवतांना आज दीसून आले. नगर परिषद घाटंजी शहरातील मुख्य आठवडी बाजार परिसर हा आठवडी बाजार करिता मंजुर असून सदर जागेवर शासनाचे राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित केले जातात आपण सदर जागेवर टीनाचे शेड टाकून काही अनधिकृत दूकानदारांनी मोठ्या थाटात दूकान उभारुन अतिक्रमण केले आहे.सदर अतिक्रमण केलेली जागा तात्काळ मोकळी करून देण्यात यावी, अन्यथा आपणा विरुद्ध महाराष्ट्र व प्रादेशिक व नगर पालिका अधिनियम १९६५ चे कलम १८९ (८) व (९) तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ५२,५३,५४ प्रमाणे आपले विरुद्ध कार्यवाही करण्यात येईल व नगर परिषद स्वखचनि आपण केलेले अतिक्रमण काढून साहित्य जप्त करण्यात येईल व होणारा खर्च आपणा कडून वसूल करण्यात येईल, होणाऱ्या नुकसानीस आपणसर्वस्वी जबाबदार राहणार ही सक्त ताकीद देत स्वराज मुख्याधिकारी व न.प. सोबत घेत अनधिकृत अतिक्रमण हटाओ मोहीम चालू करुन अतिक्रमण धारकावर बडगा उगारल्याच दीसत आहे. या कडक कार्यवाही ने आता घाटंजी बाजार परिसर व आझाद मैदान पुन्हा मोकळा स्वास घेण्यास येत्या काही दीवसित सज्ज होण्याचे चिन्ह दीसत आहे.