क्राइम

दारूचा नशा चढला आणि त्यांनी मित्राचा मुडदा पाडला

Spread the love
भंडारा / प्रतिनिधी 

 
            एकदा दारू पोटात गेली की मग जुने वाद उफाळून वर येतात. आणि मग बाचाबाची वाढते. आता सगळेच पिले असल्याने कोणी कोणाला समजावण्याचा मनस्थितीत नसतो. या वादाचे रूपांतर मग हाणामारीत होते. आणि अश्यातच मग कोणाचा जीव देखील जातो. अशीच घटना जिल्ह्यातील टाकळी परिसरात घडली आहे.घटनेच्या काही तासातच पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. कपिल उजवने असं मृत व्यक्तीचं नाव आहे, तर रिषभ घानोडे आणि करण भेदे अशी आरोपींची नाव आहेत.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, भाडांरा जिल्ह्यातल्या टाकळी परिसरात ही घटना घडली आहे. मित्रांनीच दारूच्या नशेत धारदार शस्त्रानं वार करत आपल्या मित्राची हत्या केली आहे. ही खळबळजनक घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.  या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा केला व तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपींना बेड्या ठोकल्या. कपिल उजवने असं मृत व्यक्तीचं नाव आहे, तर रिषभ घानोडे आणि करण भेदे अशी आरोपी मित्रांची नावे आहेत. भंडारा पोलिसांनी आरोपींना अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे
आरोपींनी दारूच्या नशेत ही हत्या केली. कपिलवर धारदार शस्त्रानं वार करण्यात आले. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. दारूच्या नेशत त्याची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, मात्र त्याच्या हत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close