Uncategorized

झटाळा येथे महिला दिन साजरा विश्वस्नेह फाउंडेशन व राष्ट्रनिमार्माण विचारधारेने महीला सक्षमिकरणासाठी कार्यक्रमाचे केले आयोजन.

Spread the love

 

घाटंजी- तालुका प्रतिनिधी


विश्वस्नेह फाउंडेशन व महिला ग्रामवासी झटाळा यांच्या परिश्रमाने महिला दिनानिमित्य महिलोन्नती व महिला सक्षमीकरणासाठी महिलांतून राष्ट्र निर्माण विचारधारेचा विचार प्रवाह प्रवाहित करून अज्ञान, अंधश्रद्धा व पुरुषप्रधान संस्कृतीच्या विकृत पाशवी जाचातून मातृशक्तीला मुक्त करण्यासाठी ‘जागर स्त्रीशक्तीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी बहुल झटाळा या गावामध्ये करण्यात आले.
मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या सुनिता ताई काळे अध्यक्ष महिला सत्यशोधक समाज विचार मंच यवतमाळ यांनी आपले परखड मत व्यक्त करताना महिलांना कालही व्यवस्थेशी झगडावं लागलं व आजही व्यवस्थेशीच झगडावं लागत आहे.शिक्षणाशिवाय महिलांचा उद्धार कोणीही करू शकत नाही म्हणून सर्वांनी शिकावे आणि सर्वांना शिकवावे. हा एक ध्यास घेऊन जर महिला जीवन जगल्या तर त्यांचा उद्धार निश्चित होईल असे मत सुनीताताईंनी व्यक्त केले. एडवोकेट अनुपमा ताई दाते मॅडम यांनी महिलांविषयी असणारे कायदे व त्याविषयी असणाऱ्या जाणिवा आणि जागृती या विषयी महिलांना अवगत करून दिले. सामाजिक कार्यकर्त्या शितलताई ठाकरे पोलीस पाटील यांनी महिलांना कर्तृत्व शूर ऐतिहासिक महिलांचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर ठेवून जीवन जगावे व कालच्या मुली व आजच्या मुली यांच्या जगण्यातील तफावत लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचे आव्हान त्यांनी केले यावेळी एडवोकेट पवार मॅडम व संध्या डहाके उपस्थित होत्या.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बेबीताई पराचे, सरपंच झटाळा . व प्रमुख अतिथी म्हणून रवींद्रजी मसराम,दिलीपजी जैस्वाल, विलासजी काळे सर, जीभकाटे साहेब, रवी गेडाम,श्रीराम कनाके,श्रीराम कनाके,लक्ष्मण गेडाम उपस्थित होते.
याप्रसंगी पंचक्रोशीतील बचत गटाच्या माध्यमातून नावलौकिक साधणाऱ्या
ज्योत्स्ना वरगंटीवार तरोडा,गंगाबाई सुरे रायसा,लक्ष्मीबाई शेंडे नागेझरी,रोशनी टेकाम रहाटी,सतिका नगराळे कुर्ली,देवशाली दांडेवार पारवा,सरला मडावी मेजदा,रंजना मडावी दत्तापूर,सुनिता मसराम सायतखर्डा, पल्लवी गावंडे देवधरी,अर्चना धुर्वे झटाळा या महिलांचा पुष्पगुच्छ व मानवतेचा कळस समाजशास्त्रज्ञ गाडगेबाबा हे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची प्रास्ताविक समाजसेविका चंदाताई गेडाम यांनी केले, तर संचालन दुर्गा गेडाम व रमाताई गेडाम यांनी केले.
या कार्यक्रमाचे आयोजन सुमन किनाके,चंद्रभागा चौधरी,ताराबाई बेजपवार,सुमन जाधव, ज्योती जैस्वाल, शशिकला धुर्वे, शुभांगी कोटनाके, पायल पेंदोर, शुभांगी सोनुले ,शोभा कनाके, पार्वताबाई गेडाम,अंबुबाई उईके, वर्षा मसराम, जयतुबाई गेडाम, रेणुका तोडसाम,अर्चना धुर्वे यांनी केले तर राष्ट्र निर्माण विचारधारेचे निमंत्रक गणेशजी साबापुरे, मधुकरजी गेडाम,हनुमानजी कुमरे, विष्णूजी नेवारे,हनुमानजी राऊत,विलासजी कोरांगे, पांडुरंग किरणापुरे,दिलीपजी हेमके, संतोष गोलर ,मेंगेवार सर, माळवी सर,व गजेंद्र ढवळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Pande Sanjay

Related Articles

Back to top button
Close
Close