प्रेमात विलन बनलेल्या मित्राला मित्रांच्या मदतीने संपवले
हरिद्वार / प्रतिनिधी
आजच्या जगात कोणाचा कोणावर कधी जीव जडेल आणि कोण कधी कोणाचा जीव घेईल,पर्वमात याची काही शाश्वतीच राहिलेली नाही. रोज इतक्या चित्रविचित्र घटना घडताना दिसतात किंवा वाचायला मिळतात, की प्रचंड धक्का बसतो.
पूर्वी प्रेम खरं आणि मनापासून असायचं. त्यामुळे त्यात कितीही अडथळे आले किंवा कोणी त्यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला तरीही प्रेम होतं नसे. पण सध्या च्या काळातील प्रेम हे अंतकरणाने नव्हे तर
अशीच एक घटना उत्तराखंड राज्यात हरिद्वारमध्ये घडली आहे. आपल्या मित्रावर गर्लफ्रेंडचं प्रेम जडल्याने एका युवकाने आणखी दोघांची मदत घेऊन त्या मित्राची गळा दाबून हत्या केली.
हरिद्वारमध्ये ही घटना घडली. एसपी सिटी पंकज गैरोला यांनी या प्रकरणाची माहिती दिली. रामनगर कॉलनी रावली महदूद इथे राहणारा 24 वर्षांचा विनीत बुधवारपासून बेपत्ता होता. तो मूळचा मुझफ्फरनगरचा होता आणि एका फॅक्टरीत काम करत असे. विनीतचा भाऊ बिजेंद्र पाल याने बुधवारी रात्री पोलिसांत तक्रार दिली, की त्याचा 24 वर्षांचा धाकटा भाऊ संध्याकाळपासून घरी आलेला नाही. तो भाजी आणायला बाजारात गेला होता. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
तेव्हा पोलिसांना कळलं, की विनीत संध्याकाळी आपल्या मित्रांबरोबर बाइकवरून निघून गेला होता. त्याचा मित्र अंकुश याला अधिक चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर साऱ्या प्रकरणाचा उलगडा झाला.
पोलीस चौकशीत अंकुशने सांगितलं, की त्याने काही काळापूर्वी विनीतकडून मोबाइल फोन घेऊन आपल्या प्रेयसीला कॉल केला होता. त्यामुळे विनीतच्या मोबाइलवर तिचा नंबर होता. त्यामुळे त्यानंतर विनीत तिच्याशी गप्पा मारू लागला. काही दिवसांनी अंकुशच्या प्रेयसीने अंकुशशी ब्रेकअप करून विनीतशी रिलेशनशिप सुरू केली. त्यामुळे अंकुशला राग आला होता. म्हणूनच त्याला विनीतचा बदला घ्यायचा होता.
विनीतचा बदला घेण्यासाठी अंकुशने आपल्या दोन मित्रांची मदत घ्यायचं ठरवलं. सचिन आणि जॉनी ऊर्फ अनंत अशी त्या मित्रांची नावं. त्या तिघांनी मिळून विनीतच्या हत्येचा प्लॅन आखला. त्यानंतर त्यांनी विनीतला गाठलं आणि त्याला दारू पाजली. दारूच्या नशेत असताना त्या तिघांनी मिळून गळा दाबून विनीतला ठार केलं आणि आपला प्लॅन तडीस नेला.
तिकडे आपला भाऊ घरी न गेल्यामुळे विनीतच्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पुढचा सगळा उलगडा झाला. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. तसंच, हत्या झालेल्या विनीतचा मृतदेहही ताब्यात घेतला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.