शिक्षक भरती मध्ये सोयगांंव तालुक्याला प्राधान्य द्या,शिक्षक भारती संघटना सोयगांव ची मागणी…!
सोयगाव तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात सध्या पविञ पोर्टल मार्फत शिक्षक भरती सुरू असून छञपती संभाजीनगर जिल्हा परीषद मध्ये सुध्दा शिक्षक भरती होत असून छञपती संभाजीनगर जिल्हा परिषद मध्ये शिक्षक म्हणून निवड झालेल्या उमेदवारांची कागद पञे तपासणी झालेली असुन लवकरच त्यांना नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत. या शिक्षक भरती मध्ये छञपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगांव हा डोंगराळ दुर्गम , आदिवासी बहुल संख्येचा तालुका असून या तालुक्यामध्ये शिक्षकांची अनेक पदे रिक्त असून ती पदे या भरती मध्ये भरण्यात यावी जेणे करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. तसेच या शिक्षक भरती मध्ये सोयगांव तालुक्याला विशेष प्राधान्य देण्यात यावे या मागणीचे निवेदन शिक्षक भारती सोयगांव यांच्या कडून गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्फत मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद छञपती संभाजीनगर, शिक्षणाधिकारी जिल्हा परीषद छञपती संभाजीनगर यांना देण्यात आले.यावेळी शिक्षक भारती मार्गदर्शिका शिला राठोड ,मोतीराम जोहरे,राजमल चव्हाण , शिक्षक भारती तालुकाध्यक्ष किरण पाटील, भाऊसाहेब सुर्यवंशी,किशोर जगताप,अभिमान पाटील,प्रविण गव्हांडे,अमोल पाटील,नरेंद्र बारी,बाजुळगे ,महेश गवांदे यांच्या सह तालुक्यातील शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यावेळी गटशिक्षणाधिकारी कार्यालया मार्फत सुपडू सोनवणे यांनी निवेदन स्विकारले.