राजेगाव ग्रामपंचायत सदस्या अपात्र
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने खळबळ
जवाहरनगर (भंडारा) :-
भंडारा तालुक्यातील राजेगाव ( एम.आय. डी .सी. ) ग्रामपंचायतीच्या सदस्यां ज्योती देवानंद उके यांना अपात्र ठरविण्याचा निर्णय भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. या निर्णयामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. आता पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी सदस्यांची धावाधाव सुरू झाली आहे
भंडारा येथील जिल्हाधिकारी यांनी २६ फेब्रुवारी २०२४ रोजी हा निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार राजेगावं येथील ग्रामपंचायत सदस्या ज्योती उके
यांनी गट क्रमांक १०५/२ या शासकीय जागेमध्ये प्लॉट क्रमांक ३१ वर अतिक्रमण करून त्यावर बांधलेले घराला मालमत्ता क्रमांक १५६ असे देण्यात आले व ज्योती उके या संयुक्त कुटुंबात राहत असल्याचे सिद्ध झाले असल्याने,अतिक्रमण केल्याचे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४-१ ( ज.३) अंतर्गत दोषी आढळून येत असल्याने त्यांना ग्रामपंचायत राजेगाव येथील सदस्या या पदावरून रिक्त करण्यात आल्याचे कोर्ट विद्यमान जिल्हाधिकारी यांचे न्यायल्याने घोषित केले आहे .१९ मे २०२३ ला अपात्र सदस्या ज्योती उके राजेगावं ग्रामपंचायतचे पोट निवडणुकीमध्ये सदस्या म्हणून निवडून आलेल्या होत्या
……………..