शिकागो येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रांतपाल परिषदेच्या चर्चासत्रात डॉ. रिपल राणे होणार सहभागी
डॉ. रिपल राणे यांना दि. 25 फेब्रुवारीपासून अमेरिका येथे जात असतांना लायन्स क्लब पदाधिकारी व सदस्यांनी अभिनंदनाचा वर्षाव करून दिल्या शुभेच्छा
आर्वी, प्रतिनिधी /पंकज गोडबोले
आर्वी : येथील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ व विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे डॉ. रिपल राणे येत्या २५ फेब्रुवारीला अमेरिकेला जात असताना लायन्स क्लब पदाधिकारी व सदस्यांनी दिल्या शुभेच्छा!
तिथल्या इलिनोईस प्रांतातील प्रसिद्ध शहर शिकागो येथे लायन्स क्लब इंटरनॅशनल द्वारा आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित पाच दिवसीय प्रांतपाल परिषद- चर्चासत्रात सहभागी होणार आहे.
आपल्या अमेरिका दौऱ्यात ते चर्चासत्रातील सहभागासोबतच लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या ओक ब्रुक शहरातील मुख्य कार्यालयाला सुद्धा भेट देणार आहे.
आर्वी सारख्या छोट्या व ग्रामीण भागातून प्रांतपाल पदावर पोहोचले व आपल्या कर्तुत्वाने आर्वी शहराच्या गौरवात भर टाकणाऱे पहिले प्रांतपाल आहे. असे लाॅयन्स क्लब, आर्वी (अध्यक्ष) प्रमोद नागरे यांनी यावेळी सांगितले.
डॉ. रिपल राणे यांच्या निवासस्थानावरून जात असताना आगामी वाटचालीसाठी तसेच त्यांच्या अमेरिका दौऱ्यासाठी लाॅंयस क्लब आर्वीच्या सर्व सदस्यांनी पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी लाॅंयस क्लब आर्वीचे प्रमोद नागरे लायन्स क्लब (अध्यक्ष), प्रशांत कांडलकर, सुमन देशमुख, सुरेंद्र जाने, नितीन वानखडे, ढाके साहेब, आशिष अग्रवाल, नकुल महामुणे, पंकज गोडबोले, डॉ. कालिंदी राणे, सुनिता जाने, ढाके मॅडम प्रामुख्याने उपस्थित होते.