क्राइम

धनप्राप्ती साठी  डॉक्टर दाम्पत्याचा त्या कृतीने हादरून गेले होते केरळ

Spread the love

डॉक्टर दाम्पत्याने दोन महिलांचा नरबळी देत खाल्ले होते त्यांचे मांस  

एलनथूर  (केरळ )/ नवप्रहार मीडिया

                  पैसा हा सगळ्यांना हवाहवासा वाटणारा विषय आहे. अनेक असे लोकं आहेत ज्यांना कमी वेळेत जास्त पैसा हवा असतो. मग ते त्यासाठी वाम मार्गाचा देखील अवलंब करतात. अश्या लोकांत काही उच्चशिक्षित लोक देखील आहेत. केरळ मध्ये पैश्याच्या हव्यासापोटी डॉक्टर दाम्पत्याने दोन महिलांची नरबळी देण्यासाठी हत्या केली होती. या उच्चशिक्षित दाम्पत्याने केवळ नरबळीच दिला नाही तर त्यांच्या शरीराचे मास देखील खाल्ले. केरळ सारख्या शिक्षित राज्यात हा प्रकार घडल्याने त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती.

एकीकडे जगात विज्ञान-तंत्रज्ञान वेगानं विकसित होत असताना, दुसरीकडे तंत्र, मंत्र आणि नरबळीसारख्या घटना घडत आहेत. एखाद्या गोष्टीच्या हव्यासापोटी मांत्रिकाच्या नादाला लागून अंधश्रद्धा जोपासत नरबळीसारखी अमानवीय कृत्यं केल्याच्या अनेक घटना यापूर्वीदेखील समोर आल्या आहेत.

केरळमध्ये गेल्या वर्षी अशीच एक घटना घडली होती. एका डॉक्टर दांपत्यानं मांत्रिकाच्या सांगण्यावरून दोन महिलांची हत्या केल्याचं उघडकीस आलं. या तिघांना पोलिसांनी अटक केली होती.

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार केरळ हे सर्वाधिक साक्षर असलेलं राज्य आहे. याच राज्यात नरबळीसारखी घटना घडल्याने साक्षरतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. देशातल्या अनेक राज्यांत रुढीवादी विचारसरणी आणि बळीप्रथेविरोधात लढा सुरू असताना केरळमध्ये याच कारणावरून दोन महिलांची हत्या झाली आहे.

केरळमधल्या तिरुवल्ला नगर जवळील एलनथूर या निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या गावात दोन महिलांचा नरबळी देण्यात आला होता. तिथल्या एका डॉक्टर दांपत्याने पैशांच्या हव्यासापोटी दोन महिलांची निर्घृण हत्या केली. इतकंच नाही तर हत्येनंतर त्यांनी एका मृतदेहाचे 56 तुकडे केले. दोन्ही महिलांची छाती कापली. आरोपींनी हत्येनंतर मृत शरीराचे काही अवयव खाल्ले, असं समजतं. याबाबत तपास सुरू आहे. या घटनेत डॉक्टर भगावल सिंह, त्याची पत्नी लैला आणि मांत्रिक मोहम्मद अशा तिघांचा प्रमुख सहभाग आहे. या तिघांना पोलिसांनी 11 ऑक्टोबर 2023 रोजी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांत्रिक शफी मानसिक रुग्ण आहे. त्याने लैंगिक संबंधासाठी हा गुन्हा केला. त्याने श्रीदेवी नावानं फेसबुकवर प्रोफाइल तयार करून त्या माध्यमातून भगावल सिंह आणि लैलासोबत मैत्री केली आणि रशीद असं नाव सांगत धर्मगुरू असल्याची बतावणी केली. गेल्या चार वर्षांपासून हे दांपत्य शफीच्या म्हणण्यानुसार चालत होतं. त्याच्या विरोधात लैंगिक अत्याचार, चोरी आणि हत्येच्या प्रयत्नासह दहा गुन्हे दाखल आहेत.

कोचीत राहणाऱ्या आर. पद्मा (वय 52) आणि कलाडी येथे राहणारी रोजली (वय 53) या दोन्ही महिला आर्थिक समस्येचा सामना करत होत्या. त्यासाठी लैलानं तांत्रिक मोहम्मद रफीशी बोलणं केलं. तांत्रिकाने श्रीमंत बनण्यासाठी नरबळी द्यावा लागेल असं लैलाला सांगितलं. लैला नरबळी देण्यासाठी तयार झाली. पैशांचं आमिष दाखवून ती या दोन महिलांना घेऊन तांत्रिकाकडं एलनथूरला गेली. त्यानंतर त्यानं तंत्रसाधनेचा बनाव करून त्या दोघींचा बळी दिला. या दोन्ही महिला सप्टेंबरपासून बेपत्ता होत्या, असं पोलिसांनी सांगितलं.

कोची पोलिसांच्या माहितीनुसार, लैलानं रोजलीचं शिर कापून तिची हत्या केली. त्यानंतर शफीनं पद्मावर चाकूने वार करून तिची हत्या केली. डॉक्टर दांपत्याने दोघींचे मृतदेह घराच्या अंगणातल्या बागेत एका खड्ड्यात पुरून टाकले. ही घटना 27 सप्टेंबर 2023 रोजी घडली. एलमकुलम इथल्या वन बीएचके अपार्टमेंटमध्ये राहणारी लॉटरी विक्रेती आर. पद्माच्या कुटुंबानं ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि फोन रेकॉर्ड तपासले असता एक व्यक्ती पद्माला घेऊन तिरुवल्लाला गेल्याचं निष्पन्न झालं. तपासात ही व्यक्ती शफी असल्याचं स्पष्ट झालं.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close