हटके

डॉक्टरांनी रुग्णाला तपासताच त्यांना बसला धक्का 

Spread the love

नवी दिल्ली  / नवप्रहार मीडिया 

                  डॉक्टरांनाकडे अनेक रुग्ण आपल्या समस्या घेऊन गेट असतात.पण काही घटनेत रुग्णाला पाहून किंवा त्याचे आजार पाहून डॉक्टरांना देखील धक्का बसतो. अशीच एक घटना अमेरिकेतील फ्लोरिडा येथील आहे. येथे उपचारासाठी आलेल्या रुग्णाला डॉक्टरांनी तपासून जेव्हा त्याच्या नाकाचे ऑपरेशन केले तेव्हा त्यांना धक्का बसला.कारण त्याच्या नाकातून 150 च्या जवळपास जिवंत किडे निघाले.आश्चर्याची बाब म्हणजे हे किडे त्याच्या कवटीच्या अगदी वर आणि मेंदूच्या अगदी खालपर्यंत पोहचले होते.

एका व्यक्तीच्या नाकातून डॉक्टरांनी तब्बल 150 जिवंत किडे काढले. ते व्यक्तीच्या नाकाचं मांस खाऊन जिवंत होते. धक्कादायक गोष्ट म्हणजे व्यक्तीला याविषयी कानोकान माहिती नव्हती. त्याला काही जाणवलंही नाही.

समोर आलेली ही घटना अमेरिकेतील फ्लोरिडामधील आहे. फर्स्ट कोस्टच्या अनुसार, रुग्णाची ओळख लपवण्यात आली आहे. व्यक्तीला अचानक नाकातून रक्त येऊ लागलं आणि त्रास होऊ लागला. यानंतर तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला. डॉक्टरांनी जेव्हा नाकाच्या आतील दृश्य पाहिलं तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांना डझभर किडे दिसले.

डॉक्टरांनी सांगितलं की, वेदनामुळे त्याचा चेहरा सुजला होता. बोलण्यातही त्रास होतो.भीतीची गोष्ट अशी होती की त्याच्या नाकात वाढणारे किडे त्याची दृष्टी हिरावून घेऊ शकत होते. यामुळे त्याचा जीवही जाऊ शकत होता.

डॉक्टर म्हणले, अळ्या रुग्णाच्या कवटीच्या अगदी वर आणि मेंदूच्या अगदी खाली होत्या. अळ्या तिथून जाऊन मेंदूपर्यंत पोहोचल्या असत्या तर त्याचा मृत्यू झाला असता. ऑपरेशननंतर, रुग्णानं सांगितले की त्याचा ट्यूमर 30 वर्षांपूर्वी काढला गेला होता आणि त्याच्या कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीमुळे संसर्ग पसरला असावा.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close