भोपळे विद्यालयात शिक्षण सप्ताहानिमित्त इको क्लबच्या वतीने वृक्ष महोत्सव
हिवरखेड/ प्रतिनिधी
हिवरखेड येथील सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील इको क्लब व सामाजिक वनीकरण परिक्षेत्र तेल्हारा विभागाच्या वतीने शिक्षण सप्ताहाचे औचित्य साधून वृक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे, प्रमुख उपस्थितीत सामाजिक वनीकरण परिक्षेत्राचे वनपाल संतोष गिरणारे, संस्थेचे सहकार्यवाह विभाग प्रमुख स्नेहल भोपळे, प्राचार्य संतोषकुमार राऊत हे होते. यावेळी गिरणारे यांनी उपस्थित इको क्लबच्या विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्व सांगून विद्यार्थ्यांना शालेय जीवनात निसर्गाप्रती आवड असावी. यामुळे विद्यार्थी दशेत समाजात पर्यावरण विषयक जनजागृती करणे शक्य होते, असे मत प्रतिपादन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे, शिक्षक-शिक्षिका व शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्तें इको क्लब फॉर मिशन लाइफ या थीम नुसार एक वृक्ष माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचलन स्वप्नील गिऱ्हे यांनी केले. याप्रसंगी पर्यावरण विषयाचे शिक्षक प्रा.निलेश गिऱ्हे, अभिजीत भोपळे, प्रा. अमोल दामधर, सामाजिक वनीकरण विभागाचे शैलेश भड यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी वृक्ष महोत्सवाच्या यशस्वीतेकरिता अथक परिश्रम घेतले.