राजकिय

बहरों को सुनाने के लिए धमाके की जरूरत है। अमित ठाकरे!

Spread the love

 

पुणे (प्रतिनिधी)

बहरों को सुनाने के लिए धमाके की जरूरत हैं।या क्रांतिकारक भगतसिंग यांच्या उद्गगाराची आठवण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी आज पुण्यात प्रशासनाला करून दिली.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून अमित ठाकरे आज पुण्यात आक्रमक झाले. विद्यार्थ्याच्या विविध मागण्यांसाठी
पुण्यात विद्यार्थ्यांच्या मोर्चाचे नैतृत्व अमित राज ठाकरे यांनी केले.

मनसेच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुमारे तीन हजार, आणि पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यातील संलग्न ८०० महाविद्यालयांमध्ये सुमारे सात लाख विद्यार्थी शिक्षण घेतात विद्यार्थ्यांना राहण्यासाठी सुसज्ज वसतीगृह, विद्यार्थ्यांच्या शिक्षणानंतर त्यांच्या रोजगारासाठी संधी विद्यार्थ्यांना अजूनही वसतिगृहाची कमतरता आहे. त्यामुळे तातडीने नवे वसतिगृह बांधण्याची प्रक्रिया सुरू करावी. तसेच वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकाराचे जेवण मिळावे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना ही मराठी भाषेचा प्रसार प्रचार करण्यासाठी झाली आहे. या बाबी लक्षात घेऊन विद्यापीठाने मराठी भाषा भवनाची निर्मिती पूर्ण करून ते विद्यार्थी, नागरिकांसाठी खुले करावे.अशा मागण्यांसाठी आज प्रचंड मोर्चा काढण्यात आला होता.
शिक्षणासाठी परदेशात किंवा परराज्यात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यावश्यक कागदपत्रे वेळेवर मिळत नाहीत.यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे यामुळे या केंद्रातील सर्व सुविधा ऑनलाईन करा.
वसतिगृहांची दुर्दशा आणि मेसमधील निकृष्ट जेवण यांमुळे विद्यार्थी संतप्त आहेत या विद्यार्थ्यांनी मेस मधील दुरावस्थेची छायाचित्रे प्रसार माध्यमांसमोर सादर केली

विशाखा समितीत विद्यार्थिनींना प्रतिनिधित्व द्या.

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना नोकरी- रोजगाराची कोणतीही शाश्वती नाही.

विद्यापीठाने स्वतंत्र प्लेसमेंट विभाग आणि प्लेसमेंट पोर्टल सुरू करावे. रोजगार मेळावे घ्यावेत.

हाणामारी, छेडछाड, ड्रग्जचे सेवन यांमुळे विद्यापीठ कॅम्पसमध्ये अशांतता आहे.

शिस्त मोडणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाईसाठी नियमावली बनवा

दुष्काळग्रस्त भागातील गरजू विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करा.

नवीन वसतिगृहे बांधण्याचे काम तत्काळ सुरू व्हायलाच हवे. मराठी भाषा भवन झालेच पाहिजे … !

या अशा अनेक मागण्यावर विद्यार्थ्यांनी पुणे विद्यापीठ हालवून सोडले. अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरे व बाळा नांदगावकर यांनाच कुलगुरुकडे चर्चा करण्यासाठी प्रवेश देण्यात आला.
राजकारणात प्रवेश केल्यावर अद्यापही माझ्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाही तो पुण्यातून झाला तर मला आनंदच आहे अशा ठाकरी भाषेत अमित ठाकरे यांनी प्रशासनाला ठणकावले आहे.
बहरों को सुनाने के लिए धमाके की जरूरत हैं। अशी घोषणा करुन प्रशासनाला निर्वाणीचा इशारा अमित ठाकरे यांनी दिला.

अमित ठाकरे यांना आज पुण्यात विद्यार्थ्यांचा भरपूर प्रतिसाद या मिळाला. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे अस्वच्छतेवर व दुरावस्थेवर अमित ठाकरे यांनी हल्लाबोल केला. सरकारला एक वेळा तरी धमाकेची गरज आहे आणि तो धमाका आम्ही मोर्चातून देत आहोत. बारावीची परीक्षा असल्याने मोर्चा शांततेत झाला न्ययव न मिळाला तर लवकरच मनसे स्टाईलने रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांना न्ययवे दिला जाईल असे अमित ठाकरे यांनी सांगितले. पुण्यासारख्या शहरात 4000 कोटीचा ड्रग मिळालं ही मोठी गंभीर समस्या आणि गृहमंत्र्यांनी लवकरात लवकर याप्रकरणी छडा लावला पाहिजे अशी अपेक्षा पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
आक्रमक युवा नेते अमित ठाकरे यांनी लोकसभा निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर पुण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करुन मनसेची ताकद दाखवून दिली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close