आज श्री रामदेव बाबा यात्रा… दिनेश शर्मा यांचे जागरण
धामनगाव रेलवे. / प्रतिनिधी
दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी श्री कृष्णावतार भगवान श्री रामदेव बाबा माघ मेला उत्सवाचे आयोजन आज मंगळवार दिनांक २० फेब्रूवारी ला करण्यात आलेले आहे
श्री रामदेव बाबा मंदिर परिसरात आयोजित उत्सवा दरम्यान पहाटे पासुनच धार्मिक कार्यक्रमाना सुरुवात होईल
या मंगल प्रसंगी सायंकाळी आस्था व संस्कार टीवी चे प्रसिद्ध गायक दिनेश शर्मा यांच्या द्वारे रामदेब बाबांच्या जीवनावर आधारित जम्मा जागरण आणि भजन संध्या प्रस्तुत केल्या जाणार आहे
भक्तानि उपस्थित राहण्याची विनंती श्री रामदेब बाबा ट्रस्ट ने केली आहे
………..………………………..
उत्सवात उपयोगी वस्तुंची विक्री…
उपरोक्त उत्सवा दरम्यान बाहेर गावावरुन येणारे दुकानदार उपयोगी वस्तुंची विक्री करन्याकरिता येतात ते पुस्तक,घरगुती उपयोगी वस्तु,खाण्याची स्टाल सोबतच विविध वस्तुंची विक्री करणार आहेत