घाटंजीत हिट अँड रन कायदा विरोधात चक्का जाम आंदोलन* *चालक मालक संघटनांनी घाटंजी यवतमाळ रस्ता अडवून धरल्याने काहीतास वाहतुक बंद.

घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
घाटंजीत हिट अँड रन कायद्या विरोधात चालक मालक संघटना आक्रमक झाली असुन या कायद्याला विरोध करत घाटंजीत शिवमंदीर यवतमाळ रस्ता अडवून धरत चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यात चालक संघटना कडून निवेदन देत जाचक कायदे बाबत आम्ही शासनाकडून वेळोवेळी प्राप्त हाणान्या वाहतुक सुचनांचे पालन आम्ही वाहन चालक काटेकोरपणे करतय असतो व वाहतुक तेथे भान ठेऊन वाहन चालवित असतो तरी मात्र
सद्ध्या नव्याने गृह विभागाने हिट ॲन्ड रन कायदा अस्तित्वात आणून अपघात घडल्यास जखमींना सोडून जाणानऱ्या वाहन चालकास २० वर्षाच्या कारावासाची शिक्षा तसेच ७ लाख रुपये रोख रकमेच्या दंडाची तरतुद करण्यात आलेली आहे. नव्या कायद्यामुळे वाहन चालकावर अन्याय करणारी फौजदारी कारवाई अगदी सहजरित्या होऊ शकते यामुळे वाहन चालकाच्या मानवाधिकारांचे हनन होईल आधीच तुटपुंज्या पगारात व रोजंदारी वर काम करुन कसाबसा स्वतः चार व परिवाराचा गाडा चालवणाऱ्या वाहन चालक मालक यावर हा कायदा अस्तित्वात आला तर जगणे मुश्किल होईल. कुणाचीच इच्छा नसते की,आपल्या हातुन कुणी दुखापत किंवा मरण पावले पण अनवधानाने किंवा कधी कधी समोरच्या व्यक्तीला व्यसनाने हे अपघात घडते. हा कायदा एक प्रकारे मनाची कायदा आहे सदर कायदा रद करण्यात बाबातच्या मागणी करीता हा चक्का जाम आंदोलन केले गेले. या आंदोलनात जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था,म. रा. सारखा घाटंजीच्या वतीने व चालक मालक संघटना मुजम्मील पटेल अध्यक्ष, घाटंजी,तनवीर कुरेशी, अजय माकडवार,गुड्डू शुक्ला,महेश जाधव,अवि कुळसंगे,पण गाउत्रे, रुपेश वझ्झलवार,यश फुसे,गजानन गावंडे,संदीप काळे,हेमंत काळे,शुभम गटलेवार, सुमित पेंदोर,अवि राखुंडे सह ईतरही घाटंजीतील गाडी चालक मालक उपस्थित होते. सदर मागणीचे निवेदन घाटंजी नायब तहसिलदार यांनी चक्का जाम स्थळी येऊन स्विकारले त्यावेळी घाटंजीतील प़लिस कर्मचारी यांनी आंदोलन स्थळी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वातपरी प्रयत्न केले.