जुन्या पेन्शन साठी राज्यामध्ये निघणार पेन्शन संकल्प यात्रा
.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना आक्रमक
नागपूर / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन संघटना गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट पेन्शन योजना लागू करावी यासाठी प्रयत्न करत आहे,लढत आहे परंतु आजपर्यतच्या लढ्यात फक्त आणि फक्त आश्वासने मिळाली आहेत आणि त्यामुळेच येत्या काळामध्ये महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन संघटना महाराष्ट्रात सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन सुरू करावी या एकमेव मागणीसाठी पेन्शन संकल्प यात्रा सुरू करणार आहे .
याचा उद्देश फक्त एवढाच आहे की शासनाने आता हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून जुनी पेन्शन ची मागणी करत आहे परंतु शासनाने या न त्या प्रकारे फक्त आश्वासने दिली आहेत प्रत्यक्षात मात्र काहीही मिळाले नाही.
आणि त्याचाच परिणाम म्हणून लाखोंच्या संख्येने कर्मचारी आंदोलने करीत आहेत तेव्हा या विषयाला आता शासनाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे आणि राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्याची गरज आहे तेव्हाच हे वादळ थांबेल.
*व्होट फॉर ओ पी एस*
शासनाने कुठलाही भेदभाव न करता सरसकट सर्वच कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना लागू करावी अन्यथा व्होट फॉर ओ पी एस हे एकमेव असे साधन आमच्याकडे शिल्लक राहणार आहे आणि याची प्रचिती अनेक राज्यांमध्ये आलेली आहे.
वितेष खांडेकर.
राज्याध्यक्ष ,महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना
*असा असेल संकल्प यात्रेचा नागपुर ते मुंबई चा प्रवास*
19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता नागपुर येथून ही संकल्प यात्रा सुरू होईल व पुढे तळेगाव वर्धा , अमरावती,वाशिम, यवतमाळ, नांदेड,लातूर,परभणी ,हिंगोली, सिंदखेड राजा, छ.संभाजी नगर, अहमदनगर,पुणे ,नाशिक,पालघर,ठाणे या मार्गे आझाद मैदान मुंबई येथे दि 28 फेब्रुवारी रोजी पोहोचेल.