सामाजिक
कालव्यात वाहून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली
धामणगाव रेल्वे – प्रतिनिधी
गंगाजळी येथील मुख्य कालव्यात एका अनोळखी इसमाचा मृतदेह वाहून आला होता. पोलिस तपासात त्या व्यक्तिचे नाव राजकुमार राजकोमल हरजन वय 25 हल्ली मुकाम खदान ग्रा टेकडी पार्शिवनी नागपुर असल्याचे समोर आले. हा व्यक्ति यूपी चा असुन 14 तारीख ला वाढदिवस असल्याने तो कालव्यावर वर आंघोळ करायला गेले होता पाय घसरून तो कालव्यात पडला आणि मरण पावला .
स्टोन क्रशर वरील ट्रक ड्रायव्हरला आज दुपारी १ च्या सुमारास मृतदेह तरंगताना आढळून आला असता त्याने सदर माहिती पोलीस पाटील याना दिली. त्यावेळी गंगाजळी येथील पोलीस पाटील भारती गावंडे यांनी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन याबाबत दत्तापूर पोलीस स्टेशन ला माहिती दिली होती.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1