आर्वीत मोकाट जनावरांचा हैदोस
अपघाताचे प्रमाण वाढले
जनावर रस्त्यावर तर नागरिक रुग्णालयात
नगर पालिकेने लक्ष पुरवावे
आर्वी -प्रतिनिधी
सध्या आर्वी शहरात मोकाट जनावरांचा मुक्त संचार वाढत असल्याने याचा प्रतिकूल प्रभाव शहरातील वाहतुकीवर होत असल्याचे विदारक चित्र असल्याचे दिसून येत आहेत.
हि निर्ढावलेली मोकाट जनावरे आर्वी शहरातील मुख्य मार्गाच्या मधोमध जबरीने डिय्या मांडुन बसत असल्याने या ठिकाणाहून प्रवास करताना शहरातील नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहेत. त्यामुळे या बेशिस्त मोकाट जनावरांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक पातळीवर होतांना दिसून येत आहे…
वस्तुतः वाहतुकीच्या दुष्टीने पहिलेच लहान असलेला. रस्ता त्यातही या रस्त्याच्या. दुतर्फा वाढलेल्या अतिक्रमामुळे हा मार्ग अरुंद झाला आहे. त्यातच आता या मोकाट जनावरांच्या अडथळ्यांमुळे नागरिक त्रै झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक, आठवडी बाजार, गुरुनानक धर्मशाळा, नेहरू मार्केट, गोल बाजार येथे मोकाट जनावरांचा हैदोस असतो. असे असतानाही आर्वीच्या नगरपालिका प्रशासनाकडून पाहिजे तेवढी दखल घेतली जात नाहीत, ही शोकांतिका म्हणावी लागेल. वास्तविक पाहता नगरपालिकेच्या वतीने या मोकाट जनावरांना पकडून त्यांना कोंडवाड्यात टाकून जनावरांच्या मालकाकडून आर्थिक दंड वसूल करणे, हे नितांत गरजेचे आहे.
परंतु अद्यापही नगरपालिका प्रशासनाचे या मोकाट जनावराकडे लक्ष नसल्यामुळे ही समस्या आर्वी शहरात दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने याकडे गंभीर लक्ष देऊन वेळीच उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरु लागली असुन सामाजिक कार्यकर्ते श्री गौरव भाऊ जाजू व श्री अविनाश टाके(सामाजिक कार्यकर्ते आर्वी)यांनी यावर तातडीने कार्यवाही करावी, कशी मागणी केली आहे .
……………………