सामाजिक

आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थी कार्तिक मेश्राम मृत्यु प्रकरणी आदिवासी विकास मंत्री यासह सर्व अधिकाऱ्यांवर हत्त़ेचा 302 गुन्हा दाखल करा -डॉ.अरविंद कुळमेथे

Spread the love

यवतमाळ / अरविंद वानखडे

दिनांक २९ जानेवारी रोजी आदिवासी मुलांचे शासकीय वस्तीगृह ५००, रंभाजी नगर यवतमाळ येथील विद्यार्थी कार्तिक पुंडलिक मेश्राम वय १७ वर्ष, इयत्ता १२ वी, राहणार दहेगाव, तालुका राळेगाव हा विद्यार्थी किटा- कापरा येथील डोहात बुडून दिनांक २९ जानेवारी रोजी त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. या विद्यार्थ्यांचा मृत्यू हा संश्यास्पद असून त्याच्यासोबत असलेल्या मुलांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. व आदिवासी वस्तीगृहातून वारंवार विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीसाठी बाहेर पडावे लागतात .विद्यार्थ्यांना राहण्यासाठी इमारत नाही. विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाला कंपाऊंड नाही.तिथे गार्ड नाहीत. भोजन व नाश्त्याचे विद्यार्थ्यांना पैसे मिळत असल्यामुळे विद्यार्थ्यांना वारंवार जेवणासाठी व नाश्त्यासाठी बाहेर जावे लागते. अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांच त्यावर नियंत्रण नाही. दुर्लक्ष आहे. विद्यार्थी वस्तीगृहात राहत नाही या संदर्भात अधिकाऱ्यांनी कुठल्याही पद्धतीची कारवाई अजून पर्यंत केलेली नाही. त्याची डी.बी.टी घेऊन वस्तीगृहाच्या बाहेर व गावाला राहतात. त्यामुळे वस्तीगृह प्रशासनाचे यावर कुठलाही नियंत्रण राहत नाही.यासंदर्भात बिरसा ब्रिगेडच्या वतीने वारंवार मंत्री आणि अधिकारी यांना मोर्चे आंदोलनाच्या माध्यमातून निवेदन दिले.परंतु मागील १५-२० वर्षापासून कुठल्याही पद्धतीने वस्तीगृहात योग्य त्या सोयी सुविधा निर्माण केल्या नाहीत. या उलट तास विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे वारंवार आदिवासी मुला मुलींचे वस्तीगृह व आश्रम शाळेतील विद्यार्थी मृत्युमुखी पडतात. म्हणून विद्यार्थ्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आदिवासी विकास विभागाचे मंत्री ना. विजयकुमार गावित, विकास विभाग मुंबई चे प्रधान सचिव श्री प्रदीप कुमार व्यास, आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक चे आयुक्त श्रीमती नयना मुंडे, आदिवासी विकास विभाग आयुक्त कार्यालयाचे अपरायुक्त श्री सुरेश वानखेडे, प्रकल्प कार्यालय पांढरकवडाचे प्रकल्प अधिकारी यासनी नागराजन, शिक्षण एपीओ पांढरकवडा, शिक्षण विस्ताराधिकारी पांढरकवडा, वस्तीगृहाचे गृहप्रमुख व गृहपाल इतर कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा 302 दाखल करण्यात यावा. व या सर्व दोषींना तात्काळ अटक करण्यात यावी. असा तक्रार अर्ज मृत्तक कार्तिक मेश्राम यांचे वडील पुंडलिक मेश्राम व बिरसा ब्रिगेड च्या वतीने ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणेदार यवतमाळ यांना दिला. तात्काळ कारवाई न झाल्यास महाराष्ट्रातील सर्व वस्तीगृह बंद करून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी बिरसा ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. अरविंद कुळमेथे ,राज्य संघटक साहित्यिक प्राध्यापक वसंत कनाके ,विभागीय संपर्क प्रमुख सुरज मरस्कोल्हे, उमेश येरमे, विनोद उईके, जगदीश मडावी, गौरव पंधरे व वस्तीगृहातील विद्यार्थी दिगंबर कोडापे, प्रथम देवगडकर ,मंगेश सिडाम ,नितेश कोवे ,सचिन ऊईके, समीर पेंदोर, महेश आत्राम ,आकाश मडावी, रोशन मडावी, प्रज्वल गेडाम,शिवा रनमले, आदित्य आत्राम, प्रतिम घोडाम, ऋषभ गराट, आदित्य पावले वतीने तीव्र आंदोलन करण्यात यावी येईल.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close
Click to Join Our Group