सामाजिक

जिल्हा परिषदेच्या लिंगापुर शाळेची परसबाग अव्वल

Spread the love

देशी वाणाचा भाजीपाला मुबलक.फुलझाडांची रेलचेल
आष्टी .प्रतिनिधी
ग्रामपंचायत लहान आर्वी अंतर्गत गट ग्रामपंचायत येणाऱ्या लिंगापुर येथील उपक्रम शिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील परसबाग वर्धा जिल्हात अव्वल ठरली असुन, या शाळेवर अभिनंदनाचा. वर्षाव होत आहेत.
.या परसबागेत एकवीस प्रकारच्या देशी भाजीपाल्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण वाणासह फुलझाडे आकर्षण ठरले आहेत. लिंगापुर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रधानमंत्री पोषण शक्ती अभियानांतर्गत सुंदर व मनमोहक अशी परसबाग तयार करण्यात आली आहेत. या परसबागेत पालक, मेथी, कोथिंबीर, फुलकोबी, टमाटर, गाजर,बिट,लवकी,मुळा,वांगे, मिरची, वालशेंगा,अंबाडी, वाटाणा, दोडका, फ्रेंच बीन यासारख्या एकुण21प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करण्यात आली असुन विविध प्रकारची मनमोहक फुलझाडे, फळझाडे आणि विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहेत.
परसबागेत लागवड करण्यात आलेल्या भाजीपाल्याची देशी वाणाची निवड करण्यात आली आहेत. संपूर्ण परसबाग ही सेद्रिय पद्धतीने तयार करण्यात आलेली आहे. सदर परसबागेला गावातील लोकसहभागातून निधी लाभला आहेत.
स्थानिक शेतकरी व युवक वर्ग परसबाग पाहण्यासाठी, शेतीविषयक नाविन्यपूर्ण संकल्पना समजावून घेण्यासाठी शाळेला भेट देत असल्याचे चित्र दिसून येत आहेत. एक शिक्षकी शाळेने संपूर्ण जिल्हयातुन प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल सर्व स्तरातून या शाळेचे विशेष कौतुक होत आहेत. या यशाबद्दल शाळेचे उपक्रम शिल मुख्याध्यापक निलेश इंगळे, शाळा समितीचे अध्यक्ष भाग्यश्री निंभोरकर,सरपंच सुनिल साबळे, पोलीस पाटील विक्रम निभोंरकर,,सदस्य कांता इंगोले, मारोती उईके, आष्टी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रमोद देशपांडे, यांच्या सह गावकऱ्यांनी, तसेच जयंत हिरुडकर,अविनाश टाके, राजेंद्र धार्मिक, निलेश चव्हाण, धनंजय केचे, मंगेश कोल्हे,रवि गोहत्रे,संजय ईटकीकर,लक्ष्मण बोरवार,पुरुषोत्तम आकरे,मनोजकुमार सवाई इत्यादी शिक्षकांनी व केन्द्र प्रमुखांनी विशेष कौतुक करून शाळेचे अभिनंदन केले आहेत.
……….

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close