ग्रामप्रवेशद्वार उभारणी वरून पांढरीत तणाव
विशिष्ठ समाजाचे रहिवाशी आक्रमक
अंजनगाव सुर्जी मनोहर मुरकुटे
तालुक्यातील पांढरी( खानमपूर) गावात प्रवेशद्वार बसवण्यासाठी ग्रामंपचाय ने २६ जानेवारी ला ठराव घेतल्यानंतर गावातील काही विशिष्ठ समाजाच्या नागरिकांनी कच्चे प्रवेशाद्वार उभारुन त्यावर महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार पांढरी असे फलक लावल्याने गावात अनूचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांनी गावकऱ्यांना प्रवेशद्वार काढण्यासाठी विनंती केल्यावरही गावकऱ्यानी दाद न दिल्याने अखेर बुधवारी (ता.१४) प्रचंड पोलीस ताफ्यासह पोलीस प्रशासन पांढरी येथे दाखल झाले यावेळी गावात तानाव निर्माण झाला होता.
सविस्तर वृत्त असे पांढरी खानमपुर गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सिमेंट काँक्रिटचे प्रवेशद्वार तयार करुन त्यावर विश्वरत्न बाबासाहेब अंबेडकर प्रवेशद्वार असे नाव लावावे असा ठरावा ग्रामपंचायतने ग्रामसभेमध्ये २०२० ला घेतला होता.परंतू तिन वर्षाचा कालावधी लोटल्यानंतरही काही कारणास्तव प्रवेश द्वार होऊ शकले नाही.याला गावातीलच काही लोकांचा विरोध होता असे समजते.त्यानंतर २६ जाने २०२४ ला पुन्हा त्याच आशयाचा ठराव घेतल्याने विशिष्ठ समाजाच्या नागरिकांनी काही दिवसाअगोदर लोखंडी फ्रेम फलकाचे प्रवेशद्वार तयार करुन त्यावर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार नावाचे फलक लावण्यात आले होते काही गावकऱ्याच्या तक्रारीवरून पोलीस प्रशासनाने ते प्रवेशद्वार काढण्याची विनंती प्रशासनाने केली होती.परंतू गावकरी प्रवेशद्वार न काढण्यावर ठाम होते.त्यानंतर बुधवारी ता.१४ ला दंगलविरोधी पथकासह अंजनगाव सुर्जी,रहीमापूर,पथ्रोट येथील मोठा पोलीस बंदोबस्त पांढरी येथे दाखल झाल्यावर गावातील शेकडो महीला पूरुष प्रवेशद्वाराजवळ गोळा झाले.अखेर प्रशासनाने.ग्रापंचायत कार्यालयात सभा घेऊन सर्व विभागाच्या परवानगी आल्यानंतर पक्के प्रवेशद्वार लोकवर्गणीतून गावकत्यांनी बांधावे व तूर्तास हे लोखंडी प्रवेशद्वार काढावे असा प्रस्ताव त्याच्यासमोर ठेवण्यात आला होता.परतू गावकरी त्यावरही तयार नसल्याने बातमी लीहेस्तोवर पोलीस बंदोबस्त आणि गावकरी तीथेच होते.ही चर्चा संपुर्ण तालूक्यात वाऱ्यासारखी पसरल्यावर उलटसुलट चर्चेलाही पेव फुटले होते.यावेळी तहसीलदार पुष्पा सोळंके,उपविभागीय पोलीस अधिकारी शिवलाल भगत, ठाणेदार प्रकाश अहिरे,पांढरीचे सचीव सुधीर येऊल पंचायत समितीचे कर्मचारी व मोठ्या प्रामाणात नागरिक व मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.