हटके

आजीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

Spread the love

आजीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

पटना / नवप्रहार मीडिया

                      मनुष्याला काही सवयी अश्या असतात ज्या मरेपर्यंत सुटत नाहीत.मग त्या सवयी मुळे त्यांना रुग्णालयात भरती का राहावे लागत नाही. पण व्यक्ती ती सवय सोडायला तयार नसते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एक आज्जीबाई रुग्णालयाच्या बेडवर बसून बिडी ओढत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, एक  आज्जीबाई ही रूग्णालयातील बेडवर बसलेली आहे.तिच्या आजूबाजूला रुग्णालयातील काही सामान दिसते.काही वेळानंतर वृद्ध महिला आपल्याला चक्क विडी ओढताना दिसते. तिच्या सोबत असलेल्या अन्य व्यक्ती तिला विडी ओढण्यापासुन परावृत्त करत आहेत तरी ती काही त्यांच ऐकत नाही. व्हायरल होत असलेला व्हिडिओ नक्की कुठला आहे ते समजला नाही.

आज्जीचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील @manishranwaया इन्स्टाअकाउंटवर पोस्ट करण्यात आलाय. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांकडून या आज्जीच्या व्हिडिओवर भन्नाट प्रतिक्रिया करत आहेत.

एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले आहेत की,’भावा एकदा परत जाऊन व्हिडिओ पहा’तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,’आज्जीचा नादच खुळा’.अशा गमतीदार प्रतिक्रिया व्हिडिओवर मिळत आहेत. हजारोंच्या घरात व्हिडिओला व्ह्यूज मिळत असून असंख्य लाईक्स मिळत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close