जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा* हिवरा*येथे नवीन* शाळा व्यवस्थापन समिती गठीत
आर्वी / प्रतिनिधी
नुकतीच जि.प.उच्च प्राथमिक शाळा हिवरा येथे नवीन शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली. समिती गठीत करण्यापूर्वी विशेष पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्याचे काम शाळेचे मुख्याध्यापक श्री सुरेश ताजणे सर यांनी केले. अध्यक्ष म्हणून श्री पंकज दा.जावळकर तर उपाध्यक्ष म्हणून श्री दिलीप ना.चव्हाण यांची एकमताने निवड करण्यात आली. सदस्य म्हणून श्री रविंद्र रवकाळे,सौ.सविता पेंदाम,सौ.राणी धुर्वे, श्री प्रभू चव्हाण, सौ.आशा चव्हाण, सौ.वंदना चव्हाण, श्री योगेश गुरड,सौ.सविता जाधव यांची निवड पालक सभेमधुन,सर्वांना विश्वासात घेऊन, चर्चेतुन करण्यात आली. यावेळी पालक सभेचे संचालन श्री उमेशकुमार केळुत सर यांनी तर सभेचे प्रास्ताविक श्री सुरेश ताजणे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री अविनाश टाके/श्री सुरेश निनावे यांनी मानले. एकदंरित सर्व पालकांच्या उपस्थितीत निवड शांततेत पार पडली.
—————————-