श्री संताजी विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे ..तेली समाज बांधवानी केली मागणी
सुमित वानखेडे यांना निवेदन
आर्वी .नवप्रहार प्रतिनिधी
श्री संताजी अखिल तेली समाज संघटन महाराष्ट्र राज्य आर्वी शाखेतर्फ मा.श्री.सुमीतजी वानखेडे ( मा.देवेद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री याचे मानस सचीव महाराष्ट्र) यांना देण्यात आलेल्या निवेदनतून करण्यात आली आहे
सदर निवेदनात राज्यात ईतर समाजाच्या विकासात्मक दृष्टीने विविध प्रकारचे समाज विकास मंडळ स्थापन करण्यात आले आहे.त्याच अनुषंगाने तेली समाजाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, उन्नती/प्रगती करीता ” श्री संताजी विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे. कोविड-19 नंतर तेली समाजात बेरोजगारी,शेती,इतर व्यवसाय डबघाईस आला आहे.त्यामुळे आमचा तेल-घाणीचा व्यवसाय मोडकळीस आला.त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील तेली समाज हा विकासात्मक दृष्टि दुर्लक्षित राहिला आहे.
तेली समाजाचा विकास हा मुख्य प्रवाहात आणण्याकरीता श्री संताजी विकास महामंडळ स्थापन करुन तेली समाजात नवचैतन्य,आशावादी दृष्टिकोन निर्माण होईल आणी समाजाच्या सर्वागीण विकासाच्या दृष्टीने न्याय मिळेल.
आमचे स्थापक श्री.अनिलजी बजाईत याच्या मार्गदर्शनात प्रमुख उपस्थितीत श्री.अविनाश टाके,सुरेंद्र गोठाणे, भरत जैसिंगपुरे प्रकाश जैयसिंगपुरे,अरूण काहरे,प्रविण सेलोकर, मनोज गोडबोले,सतीश शिरभाते,विशु आगलावे,संदिप लोखंडे,पंकज साकोरे,पवन शिरभाते,संजय चिंधेकर, पवन पडोळे,शैलेश कारमोरे,अभिजित भिवगडे,प्रमोद गाठे,भरत,विनायक अतुल जैयसिगपुरे
पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.