सामाजिक
महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त काँग्रेसचे अभिवादन
वाडी (प्र): राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने वाडी शहर महिला काँग्रेसच्या वतीने अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.समर्थ गजानन सोसायटी येथे महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अरुणा पगारे यांच्या निवासस्थानी पुण्यतिथीनिमित्त गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली देण्यात आली.यावेळी अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्मा गांधींचे विचार आजही संपूर्ण जगाला प्रेरणादायी आणि मार्गदर्शक असल्याचे मनोगत व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाला वाडी शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अरूणा पगाडे, उपाध्यक्ष नीता मडावी, मीनाक्षी पाटील, महासचिव रूपाली जीवनकर, सचिव वैशाली कुंभरे, रिना अंबाडरे इं.उपस्थित होत्या.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1