आध्यात्मिक

असे एक हिंदू मंदिर ज्याचे रक्षण करतो एक विषारी नाग 

Spread the love

           जगभरात अनेक रहस्यमयी ठिकाणे आहेत. जे आपल्या आगळ्यावेगळ्या रहस्या मुळे प्रसिद्ध आहेत. यापैकी अनेक गोष्टींचा छडा लावण्याचा प्रयत्न वैज्ञानिकांकडून करण्यात आला. पण अनेक प्रयत्ना नंतरही ते कुठल्याच निष्कर्षावर पोहचू शकले नाही. असेच एक मंदिर इंडोनेशिया येथे आहे. समुद्राच्या मध्यभागी असलेल्या या मंदिराचे रक्षण एक विषारी नाग करीत असल्याचे सांगितल्या जाते.

या मंदिराचे नाव तनाह लोट मंदिर असून या मंदिराचे संरक्षण एक विषारी साप करतो. खरं तर, भारतामध्ये देखील अशी अनेक रहस्यमय मंदिरं आहेत मात्र, भारताबाहेरील इंडोनेशिया देशामधील या मंदिराचे रहस्य आणि कथा खूपच रंजक आहे.

इंडोनेशियातील बालीमध्ये समुद्राच्या मध्यभागी असलेले हे तनाह लोट मंदिर खडकापासून तयार करण्यात आले आहे. स्थानिक भाषेत ‘तनाह लोट’ या शब्दाचा अर्थ समुद्राची भूमी असा आहे. हे मंदिर जवळपास 600 वर्ष जुने आहे. या मंदिराला पर्यटक आवर्जून भेट देतात. या मंदिराचे सौंदर्य खूपच अद्भूत आणि मोहक आहे.

काय आहे इंडोनेशियातील तनाह लोट मंदिराचे रहस्य?

पौराणिक कथेनुसार, 15 व्या शतकात निरर्थ नावाचा एक पुजारी या समुद्रकिनाऱ्यावर फिरत होता. त्याला या ठिकाणच्या सौंदर्याची भुरळ पडली आणि त्याने इथेच राहण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणच्या सौंदर्यामुळे त्याने काही कोळ्यांच्या मदतीने मंदिर बांधलं. पौराणिक कथेनुसार, हे मंदिर समुद्राच्या देवाला समर्पित आहे. या मंदिरात रोज पूजा केली जाते. शिवाय इथे निरर्थ पुजाऱ्याची देखील पूजा केली जाते. शिवाय या मंदिरावर हिंदू धर्माचा अधिक प्रभाव आहे.

मंदिरात आहे विषारी सापाचं वास्तव्य

समुद्रामधील या मंदिरामध्ये विषारी सापाचं वास्तव्य आहे. ज्याचे स्थान एका दगडाखाली आहे. तो या मंदिराचे रक्षण वाईट शक्ती आणि घुसखोऱ्यांपासून करतो. असं म्हटलं जातं की, पुजारी निरर्थने आपल्या सामर्थ्याने या विशाल सागरी नागाला प्रकट केले जो आजही त्या मंदिराचे रक्षण करतो.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close