क्राइम

शुल्लक वाद सासऱ्याने सून आणि नातवाला केले जीवनातून बाद

Spread the love
 

बुलढाणा / प्रतिनिधी 

 
                  कौटुंबिक वाद हा काही नवीन विषय नाही . पण हा वाद विकोपाला गेला की टोकाचे पाऊल उचलल्या जाते आणि त्यातून काहीतरी अघटित घटते. अशीच घटना बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर येथील मांडी मळी येथे घडला आहे. येथे एका सासऱ्याने शुल्लक कारणावरून गर्भवती सून आणि नातवाववर कुऱ्हाडीने वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. अश्विनी गायकी आणि समर्थ गायकी (8 वर्षे) अशी मृत मायलेकाची नावे आहेत. तर  नारायण गायकी (वय 65 वर्षे) असं आरोपी सासऱ्याचं नाव आहे.

 
क्षुल्लक कारणातून वाद झाल्याने सासरा नारायण गायकी याने सून अश्विनी आणि नातू समर्थ यांची हत्या केली. धक्कादायक म्हणजे अश्विनी ह्या गर्भवती होत्या. हे सर्व माहित असताना सासरा नारायण गायकीने दोघांवर कुऱ्हाडीने सपासप वार केले.
यात 8 वर्षीय नातू जागीच ठार झाला तर सून गंभीररीत्या जखमी झाली. अश्विनीला रुग्णवाहिकेद्वारे प्रथम वरवट बकाल येथे व नंतर शेगाव येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आरोपी नारायण गायकी याला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार सुरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक दिपक सोळंके करीत आहे. हत्येनंतर स्वतः पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, एकाच दिवशी दोन हत्या झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close