क्राइम

कॉलेज ला जाते असे सांगून घराबाहेर पडलेल्या तरुणीचा एक महिन्यानंतर मिळाला मृतदेह

Spread the love

नवी मुंबई /  प्रतिनिधी

                    कॉलेज ला जाते असे सांगून घरा बाहेर पडलेली 19 वर्षीय मुलगी महिना उलटून देखील घरी परतली नव्हती. शेवटी तिचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला. मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी ती आत्महत्या की घातपात यासाठी शवविच्छेदन अहवाल मागवला. अहवालानंतर जे समोर आले त्यावरून तपासाची दिशा ठरवत तपास सुरू केला.

                           तपासात पोलिसांना समजले की वैष्णवी बाबर असे त्या मुलीचे नाव होते. तिचे मागील चार ते पाच वर्षापासून वैभव बुरगले या मुलासोबत प्रेम संबंध होते. मात्र, तिने हे प्रेम प्रकरण पुढे सुरू ठेवण्यास नकार दिला. प्रेयसीने ब्रेकअप केल्याने तरुणा राग अनावर झाला. यातूनच प्रेयसीला कायमचं संपवण्याचा कट त्याने रचला. आरोपी तरुणाने एका साथीदारासोबत तरुणीची हत्या केली. हत्येनंतर मृतदेह नवी मुंबईतील तळोजा जेल परिसरात आणून टाकला. जवळपास एक महिना मृतदेह तसाच राहिल्याने कुजला होता.

प्रेयसीची हत्या केल्यानंतर तरुणानेही रेल्वेमधून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. आत्महत्या करण्यापूर्वी मुलाने एक चिठ्ठी लिहली असून त्या चिठ्ठीत आपणच मुलीला मारले असून आम्ही पुढच्या जन्मी पुन्हा भेटू असे लिहून आपणही आत्महत्या करत असल्याचे यात नमूद केले. यासाठी कुणालाही जबाबदार धरले जाऊ नये असे नमूद केल्याचे समोर येत आहे. मुलीचा मृतदेह तळोजा जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत सापडल्याने नवी मुंबईत एकच खळबळ उडाली होती. याबाबत अधिक माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त अमित काळे यांनी दिली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close